Last Updated on 20 Aug 2024 2:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
आता घराचा उतारा मिळतोय ऑनलाईन म्हणजेच या पूर्वी आपल्याला आपल्या घराचा सीटी सर्व्हे/सी.टी.एस (city survey online) उतारा काढण्यासाठी आपल्याला उप अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयामध्ये जाऊन काढावा लागत होता परंतु आता हा उतारा आता ऑनलाईनच मिळणार आहे.या साठी तुम्हाला धावपळ करण्याची गरज नाही आपण स्वतः हा उतारा घर बसल्या काढू शकता.यामुळे तुमचा वेळ वाचेल.तुम्ही किंवा कोणीही हा उतारा अगदी दोन किंवा पाच मिनिटात तुमच्या मोबाईलवर मोफत हो अगदी मोफत कसा काढायचा याची माहिती अगदी सविस्तर पणे आपण पाहणार आहोत.
असा काढा घराचा मोफत ऑनलाईन उतारा
घराचा उतारा पाहण्यासाठी आपल्याला आपल्या घराचा सिटी सर्वे नंबर माहीत असणे आवश्यक आहे.
घराचा सर्वे नंबर माहिती झाल्यानंतर तुम्हाला भूमिअभिलेख विभागाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल खाली वेबसाईट दिलेली आहे.
घराचा उतारा पाहण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा
- या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला मालमत्ता पत्रक या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल.
- यानंतर तालुका व गाव निवडावे लागेल.
- यानंतर आपला सी टी सर्वे नंबर टाकावा लागेल.
- यानंतर पुढे या वरती क्लिक करावे लागेल.
- यानंतर कॅपच्या कोड टाकावा लागेल.
असा काढा घराचा डिजिटल ऑनलाईन उतारा
वापरकर्ता माहिती ( लॉगीन इंफॉर्मेशन )
दिलेल्या मोबाईल नंबर वरती पासवर्ड मिळेल.पुन्हा तुम्हाला होम पेज वरती यावे लागेल नंतर रेगुलर लॉगीन हा पर्याय निवडून आपण निवडलेले वापरकर्ता नाव आणि मोबाईल नंबर वरती मिळालेला पासवर्ड टाकून लॉग ईन करायचंय.इथे तुम्हाला प्रथम रिचार्ज अकाउंट हा पर्याय वापरून अकाउंट मध्ये पैसे घ्यावे लागतील.यासाठी तुम्ही क्रेडिट कार्ड ,डेबिट कार्ड ,नेट बँकिंग या पर्यायाचा वापर करू शकता.पैसे ऍड केल्यानंतर (डिजिटल प्रॉपर्टी कार्ड ) या वरती क्लिक करा.
इथे तुम्हाला
- विभाग
- जिल्हा
- कार्यालय
- गाव
सी.टी.एस नंबर (city survey online)
सी.टी.एस नंबर निवडावा.
नंतर डाउनलोड या पर्याया वरती क्लिक करावे.डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला प्रति उतारा ४५ रु भरावे लागतील.अशा प्रकारे तुम्हाला डिजिटल स्वाक्षरी उतारा मिळेल.
घराचा सीटी सर्व्हे उतारा काढा ऑनलाइन आपल्या मोबाईल वर
तुमच्या जमीन किंवा घराचे रजिस्ट्रेशन ची कागदपत्रे पहा ऑनलाईन








































































