Last Updated on 16 Oct 2023 9:02 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
सांगली । राज्यातील अडीच हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका नोव्हेंबर मध्ये होत आहेत.ग्रामीण परिसरातील गट,तट, पक्ष,भावकी,जात असे अनेक रंग अंत:प्रवाह या निवडणुकीत स्पष्ट होतील.
राज्यात 44 हजार 198 तर देशात साडेसहा लाख ग्रामपंचायती आहेत.या ग्रामपंचायती ग्रामीण विकासाची केंद्र व शासकीय योजनेसाठी दुवा ठरावी अशी अपेक्षा असते.इतर कुठल्याही निवडणुकीपेक्षा या निवडणुकात चुरस असते.सहकारी चळवळ आणि स्थानिक स्वराज्य संस्था मधून राज्यात नवे नेतृत्व उदयाला आले.
विलासराव देशमुख, बाळासाहेब देसाई हे नेते गावच्या राजकारणातून पुढे आले.देवेंद्र फडवणीस हे सुरवातीला नागपूरचे महापौर होते.एक प्रकारे या निवडणुका म्हणजे नेतृत्व घडवणाऱ्या कार्य शाळा होत.ग्रामीण परिसरात जनतेसाठी पूर्ण वेळ देणाऱ्या ग्रामीण नेतृत्वाने संस्थात्मक लोक जीवनाची उभारणी, बिगर राजकीय कृती प्रवण ता या बाबीना महत्व द्यावे ही लोकांची अपेक्षा असते.
ग्रामपंचायत निवडणुकात साध्य,साधन,विवेकाचा विचार व्हावा अशी मांडणी करणारा हा व्हिडिओ आपण पाहा…
![]()












































































