Last Updated on 17 Oct 2023 8:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करण्याची वेळ दुपारी 3 ऐवजी सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे,असे राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
नामनिर्देशनासोबत सादर करावयाचे घोषणापत्र (affidavit) संगणकप्रणालीव्दारे भरले जात आहे’मात्र त्याची प्रिंट काढताना तांत्रिक अडचण येत असल्याच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त होत आहेत.त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदांच्या;तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार आहे.
नामनिर्देशनपत्रे 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती.
नामनिर्देशनपत्रासोबत सादर करावयाचे घोषणापत्र संगणक प्रणालीद्वारे भरले जात होते, मात्र त्याची प्रिंट काढतांना तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अडचणी आता दूर करण्यात आल्या आहेत.त्यामुळे नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या उर्वरित 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीतील मुदत सकाळी 11 ते दुपारी 3 ऐवजी आता सकाळी 11 ते सायंकाळी साडेपाच अशी करण्यात आली आहे.









































































