Last Updated on 22 Sep 2024 11:09 AM by Sanjay Patil/Adhorekhit
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण बहुजन समजासाती शिक्षण विस्तार हे आपले जीवित कार्य मानले. गरीब आणि सर्व जातीतील मुलांचे शिक्षण सुरू करताना अण्णा अनुभवतून शिकत गेले. कमवा शिका, सर्व जाती एकत्र राहून भोजन, श्रमदान,शिक्षण एकत्र घडवले. रयत शिक्षण संस्था ही तळागाळातील माणसांना जीवनाच्या केंद्र स्थानी आणणारी सामाजिक प्रयोग शाळा बनली.
काही महिन्यांची तरतूद करायची असेल तर धान्य पेरा.काही वर्षांची तरतूद करायची असेल तर झाडे लावा. पिढ्यान् पिढ्यांची सोय करायची असेल तर विधायक विचारांची माणसं पेरा. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत स्पर्शाने प्रेरित झालेल्या संभाजी पाटील यांची ही गोष्ट पाहा…







































































