Last Updated on 09 Dec 2025 4:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत गोटखिंडी (ता. वाळवा) येथे रत्ना फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. मध्ये शासकीय हमीभाव खरेदी अंतर्गत ‘नाफेड’च्या सोयाबीन खरेदीला सुरुवात झाली. शेतकऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे. चार दिवसांत अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन हमीभाव खरेदी सेवा केंद्र व ई-समृद्धी ॲपद्वारे नोंदणी केली आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतातून अपेक्षित उत्पन्न आले नाही. सोयाबीनला हमीभाव मिळत नसल्याने कमी दरात सोयाबीन विक्री करावी लागत आहे. शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी झाली. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ (पुणे) संचालित नाफेड हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात येत आहे.
गोटखिंडी येथे नुकतेच हे केंद्र सुरू करण्यात आले. सोयाबीन खरेदी सुरू झाली आहे. ‘व्हीएसआय’ (पुणे) चे माजी शास्त्रज्ञ संचालक आबासाहेब साळुंखे, विनायक पाटील, निवास पाटील, पणन मंडळा (कोल्हापूर) चे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले, रत्ना फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे वैभव कोकाटे,ओंकार माने, विदुर थोरात, यशवंत घारे, अभिजित पाटील, राहुल पाटील, अभिषेक कोकाटे, प्राजक्ता राणे-पाटील, प्रतीक्षा पाटील आदी उपस्थित होते. ‘वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी करून किमान आधारभूत किमती अंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्रात विक्री करावे,’ असे आवाहन करण्यात आले.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 09 Aug 2026 11:00 PM by Sanjay Patil/Adhorekhit पुणे येथे डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशनकडून सन्मान देशभरातील साखर उद्योगातील मान्यवरांची उपस्थिती शिवनगर । यशवंतराव मो... Read more










































































