Last Updated on 05 Nov 2024 5:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
गेल्या १० वर्षात राज्यात व देशात भाजपा सरकार असताना पेठ-सांगली रस्त्यास विलंब का – आ.जयंत पाटील यांचा सवाल
तुंग येथे प्रचार शुभारंभ
सांगली । गेल्या १० वर्षापासून राज्यात व देशात भाजपाचे सरकार आहे. मग पेठ-सांगली रस्त्याच्या विलंबास दुसऱ्याला दोष कसा देता? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व इस्लामपूर विधान सभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ.जयंत पाटील यांनी तुंग येथील प्रचार शुभारंभ सभेत बोलताना केला. राज्य वाचवण्यासाठी महायुतीस सत्तेवरून खाली खेचण्यासाठी कामाला लागा असे आवाहनही त्यांनी केले.
हा मतदारसंघ तुमच्या हवाली करून मी आजपासून राज्याच्या प्रचार दौऱ्यावर जात आहे. प्रत्येकाने आपले गांव,बूथ सांभाळा, विजय आपलाच आहे,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रारंभी प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी श्री.हनुमानाचे दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, आष्टयाचे नेते वैभव शिंदे, युवा नेते प्रतिक पाटील, आनंदराव नलवडे, उद्योजक भालचंद्र पाटील, माजी सभापती वैभव पाटील, माजी महापौर मैमुद्दीन बागवान, सरपंच विमल सुर्यवंशी, भास्करराव पाटील, सचिन पाटील, विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, ॲड. चिमण डांगे, शहाजी पाटील, नेताजीराव पाटील, विनायक पाटील, बी.के. पाटील, डॉ.प्रताप पाटील, संजय पाटील, सुस्मिता जाधव, सुनिता देशमाने, बळीराजा शेतकरी संघटनेचे बी.जी. पाटील, काँग्रेस पक्षाचे राजेंद्र शिंदे, ॲड.आर.आर.पाटील, शिवसेनेचे शकील सय्यद, आरपी आयचे प्रताप मधाळे, दलित महासंघाचे शंकर महापुरे प्रामुख्याने उपस्थित होते.
आ.पाटील म्हणाले, मी एकदा विना टोल पेठ-सांगली रस्त्याचे चौपदरीकर-तीन पदरीकरण केले होते. त्यानंतर भाजपा सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी हा रस्ता केंद्रा कडे वर्ग केला. त्यामुळे आपले २०१९ ला काही वर्षे सरकार आल्यानंतर हा रस्ता करता आला नाही. मी स्वतः केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भेटून या रस्त्याची मागणी केली आणि पाठपुरावा केलेला आहे. भाजपा महायुतीने राज्याची मोठी अधोगती केली आहे. मुलांच्या हाताला काम नाही, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. महागाईने कळस गाठला आहे,भ्रष्टाचार सर्वत्र बोकाळला आहे. महिला सुरक्षित नाहीत. कायदा सुव्यवस्था पूर्ण ढासळली आहे. हे राज्य वाचवण्यासाठी भाजपा महायुतीस सत्तेवरून खाली खेचण्यासाठी कामाला लागा.
ते म्हणाले, लोकांचे कळीचे मुद्दे आणि सूचना घेऊन आपण सविस्तर जाहीरनामा येत्या काही दिवसात जाहीर करू. आज महाराष्ट्र राज्य दरडोई उत्पन्नात गुजरातपेक्षाही मागे गेले आहे. असंख्य प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेले. मात्र हे त्रिकुट काही बोलत नाही. कारण यांच्या डोक्यावर टांगत्या तलवारी आहेत.
दिलीपतात्या पाटील म्हणाले, एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष उमेदवारी मिळण्यासाठी दुसऱ्या पक्षात गेला आहे. जॅकेट घालून आमदार होता येत नाही. वैभव शिंदे म्हणाले,आपण आष्टयाची चिंता करू नका. आम्ही किती मताधिक्य देतो,ते पहा.
बी.जी.पाटील म्हणाले,आम्ही आरक्षण मागितले म्हणून आमच्या पाठीत काठ्या घातल्या,त्याचा बदला घ्यायचा आहे. अमित शहा राज्यातील सहकार मोडीत काढण्यास निघाले आहेत.
ॲड. चिमण डांगे म्हणाले,ज्यांनी २८ वर्षे आ.जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम केले,ते आता विचारतात,३५ वर्षात काय केले?
भालचंद्र पाटील म्हणाले,आ.जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमच्या ८ गावांचा विकास झाला असून आम्ही त्यांना मोठे मताधिक्य देऊ.
सुस्मिता जाधव म्हणाल्या,लोकसभेच्या दणक्यानंतर राज्यातील महिला लाडक्या बहिणी झाल्या,मात्र राज्यात महिला सुरक्षित आहेत का?
भास्करराव पाटील म्हणाले,आ.पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आमच्या गावच्या हनुमान देवस्थानास ब वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. बी.के.पाटील,शहाजीबापू पाटील,अँड.आर.आर.पाटील,वैभव पाटील, कविता पाटील,एस.के.पाटील,सचिन पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी धनाजी पाटील यांनी स्वागत व प्रास्तविक केले. सभापती संदीप पाटील, उप सभापती शिवाजी आपुगडे, संघाचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील, अभिजित पाटील, पिरअली पुणेकर, संग्राम जाधव, देवराज देशमुख, संजय चव्हाण, भरत देशमुख, प्रा.बाळासाहेब मासुले, रामभाऊ मासाळ, रामभाऊ लाड, श्रीबाळ वडगावे, दत्ताअण्णा पाटील, रविंद्र माणगांवे, राहुल माणगांवे, रमेश निर्वाणे, नितीन दणाणे, विकास कदम, प्रमोद आवटी, संभाजी गावडे, विजय आडमुठे, विलास आवटी, संजय शिंदे, झुंझारराव पाटील, विराज शिंदे, वैभव शिंदे, छाया पाटील, उज्ज्वला पाटील,शिवाजी चोरमुले,तेजस्विनी बोंडे, सुरगोंड पाटील, महावीर चव्हाण, माणिक पाटील यांच्या प्रमुख पदाधिकारी व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. संदीप कुडचीकर यांनी आभार मानले.










































































