Last Updated on 03 Nov 2022 1:18 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । निवडणूक आयोगाने गुरुवारी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या.गुजरात विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यांत होणार आहेत.182 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत 1 डिसेंबरला 89 जागांसाठी आणि 5 डिसेंबरला 93 जागांसाठी मतदान होणार आहे.हिमाचल विधानसभा निवडणुकीसोबत 8 डिसेंबरला निकाल लागणार आहेत.
निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला.यावेळी गुजरातमध्ये 4.6 लाख लोक प्रथमच मतदान करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.4.9 कोटी मतदार गुजरातमधील नव्या सरकारसाठी मतदान करणार आहेत.51,782 मतदान केंद्र असून प्रत्येक बूथमध्ये सरासरी 948 मतदार आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी 3.24 लाख मतदार पहिल्यांदा मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.
पहिला टप्पा निवडणूक कार्यक्रम
नोटिफिकेशन – 5 नोव्हेंबर 2022
उमेदवारी अर्ज अंतिम तारीख – 14 नोव्हेंबर 2022
अर्जांची छाननी – 15 नोव्हेंबर 2022
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – 17 नोव्हेंबर 2022
मतदान – 1 डिसेंबर 2022
दुसरा टप्पा निवडणूक कार्यक्रम
नोटिफिकेशन – 10 नोव्हेंबर 2022
उमेदवारी अर्ज अंतिम तारीख – 17 नोव्हेंबर 2022
अर्जांची छाननी – 18 नोव्हेंबर 2022
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर 2022
मतदान – 5 डिसेंबर 2022
दोन्ही टप्प्यांची मतमोजणी आणि निकाल – 8 डिसेंबर 2022










































































