Last Updated on 24 Jun 2023 6:05 PM by Sanjay Patil/Adhorekhit
राज्यात एकूण 4 हजार 644 तलाठी पदांची सरळसेवा भरती
पुणे | राज्यात तलाठी भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे.खेर तलाठी भरतीची प्रतीक्षा संपली; २६ जून पासून अर्ज भरण्यास सुरवात होत आहे.राज्यात एकूण 4 हजार 644 तलाठी पदांची सरळसेवा भरती केली जाणार आहे.यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तलाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यापासून 21 दिवस अर्ज भरण्यासाठी मिळणार आहेत.त्यानंतर एकूण किती दिवसात परीक्षा होईल हे आपल्याला पुढील काही दिवसात कळेलच त्यामुळे तुम्ही अभ्यासात कमी पडू नका परीक्षा केव्हा ही होऊ शकते तुम्ही तयार राहा.
भूमी अभिलेख विभागाकडून तलाठी भरती परीक्षा घेण्यात येणार असून लवकरच परीक्षेची लिंक खुली करण्यात येणार आहे. ही परीक्षा ‘टीसीएस’ कंपनीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. दरम्यान, या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यातून अर्ज भरल्यास ते बाद करण्यात येतील, याची नोंद घेण्याचे आवाहन महसूल विभागाने केले आहे.
अर्ज सादर करण्याची प्रक्रिया / कालावधी :-
| अ.क्र | तपशील | विहित कालावधी |
| 1 | अर्ज सादर करण्याचा कालावधी | दि. 26/06/2023 रोजी पासून ते दि.17/07/2023 रोजी 23.55 वाजेपर्यंत |
| 2 | ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | दि.17/07/2023 रोजी 23.55 वाजेपर्यंत |
| 3 | परिक्षेचा दिनांक व कालावधी | https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देणेत येईल. तसेच उमेदवारांच्या प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल. |

महसुल आणि वन विभाग महाराष्ट्र तलाठी भरती
पदाचे नाव: तलाठी.
एकूण रिक्त पदे: 4644 पदे.
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.
शैक्षणिक पात्रता:
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा
मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा: खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे, मागास प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
अर्ज शुल्क: खुलाप्रवर्ग: 1000 रुपये , राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक): 900 रुपये
ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख: 26 जून २०२३.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै २०२३.







































































