Last Updated on 30 Dec 2022 5:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अपघातानंतर मर्सिडीज कारने पेट घेतला!
मुंबई । भारतीय क्रिकेट संघातील युवा क्रिकेटपटू आणि विकेटकीपर ऋषभ पंत याच्या गाडीला झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला.
प्राथमिक माहितीनुसार, ऋषभ पंत आपल्या काही मित्रांसह दिल्लीहून रुरकीच्या दिशेने जात होता. त्यावेळी ऋषभ पंत याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट दुभाजकावर जाऊन आदळली. त्यानंतर गाडीने पेट घेतला.
शुक्रवारी रुडकी येथील नारसन बॉर्डरवर हम्मदपूर झाल जवळ त्यांची गाडी रेलिंगला धडकली.या अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली आहे.या अपघातात त्याच्या डोक्याला,पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
![]()
रिषभ पंत तेव्हा गाडी चालवत होता, अशी माहिती समोर येत आहे. तेव्हा त्याने नियंत्रण गमावल्यामुळे तो डिवायडरला धडकला. त्यानंतर विंड स्क्रीन तोडून तो बाहेर आला. त्याला कोणतेही फ्रॅक्चर नसून त्याच्या शरीरावरही भाजलेले डाग नाहीत. तो स्थिर असल्याचे दिल्ली क्रिकेटच्या सचिवांनी माहिती दिली.










































































