Last Updated on 19 Aug 2025 6:07 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा । कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे आज सायंकाळी 6 वाजता 11 फुटांवरून 12 फुटापर्यंत उघडले आहेत.कोयना नदीमध्ये एकूण 89,100 क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे. विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात कालपासून पाऊस पडत असल्याने कृष्णा नदीची वाटचाल पुरस्थितीकडे सुरु झाली आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज दि. १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 11 फुटांवरून 12 फुटापर्यंत उघडून 87,000 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण 89,100 क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे.
सातारा जिल्ह्यात देखील पावसाचा जोर वाढला आहे. महाबळेश्वर, कोयना धरण परिसरात पाऊस सुरु आहे. धरणातील पाण्याची आवक प्रतिसेंकद 91 हजार 271 क्युसेस अशी सुरू आहे. आज (19 ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजेपर्यंतआलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 100.39 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण 95.38 टक्के भरले आहे. पुन्हा एकदा कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आधीच कोयना धरणातून कोयना नदीमध्ये एकूण 89,100 क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे.सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे. त्यातच चार दिवसांपासून कोयना, कृष्णा आणि चांदोली पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस कायम असल्याने, सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांची वाटचाल पूरस्थितीकडे सुरु झाली आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 14 Oct 2026 9:15 PM by Sanjay Patil/Adhorekhit आणखी चाळीस तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश, परीक्षा शुल्क सरसकट माफ होणार पिण्याचे पाणी, चाऱ्याची उपलब्धतेबाबत नियोजन; शेतकऱ्यांकडून वसूली... Read more








































































