Last Updated on 06 Jul 2025 9:30 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. सातारा जिल्ह्यात अजूनही पाऊस सुरूच आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेले कोयना धरणात एकूण पाणीसाठा 66.46 टीएमसी (63.14 टक्के) झाला आहे. प्रति सेकंद 30,891 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे.
कोयना धरणातील पाणीसाठ्यात मुसळधार पावसामुळे झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत कोयनानगर येथे 104 मिलिमीटर, नवजाला 115 मिलिमीटर आणि महाबळेश्वरला 95 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ही आकडेवारी 06 जुलै 2025 सकाळी 8 पर्यंतची आहे.
या धरणाची पाणी साठवण क्षमता 105.25 टीएमसी आहे. पायथा ग्रहातून 1050 क्यूसेक्स विसर्ग कोयना नदीपत्रात सुरु आहे. कोयना धरणाच्या नवीन तांत्रिक वर्षाला 1 जूनपासून प्रारंभ झाला. 31 मे अखेर धरणात 17.80 टीएमसी (17.77 टक्के) इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.
यावर्षी जून महिन्याच्या सुरवातीपासूनच पावसाने कोयना धरणक्षेत्रात पावसाला सुरूवात केली. त्यामुळे अवघ्या 15 दिवसांतच या पावसाने मागील 10 वर्षांतील जून मधील विक्रमी पावसाची नोंद केली. मागील 10 वर्षांची कोयनानगरची सरासरी काढली तर साधारणपणे 800 ते 900 मिलीमीटर पाऊस होतो. पण, यंदा जूनमध्ये तब्बल 1 हजार 581 मिलीमीटर पाऊस पडला आहे. यामुळे कोयनानगरच्या पावसाने 10 वर्षांतील नवीन विक्रम नोंदवला.
एक जूनपासून आतापर्यंत कोयनेत 1 हजार 974 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे आतापर्यंत 1 हजार 779 आणि महाबळेश्वरमध्ये 1 हजार 835 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
कोयना धरण
06 जुलै 2025
वेळ: सकाळी 08:00 वाजता
पाणीपातळी:2125’11″(647.979मी)
पाणीसाठा:66.46 टीएमसी(63.14%)
आवक:- 30,891 क्यूसेक्स(2.66 टीएमसी)
पायथा ग्रहातून 1050 क्यूसेक्स विसर्ग कोयना नदीपत्रात सुरु आहे
पाऊस मि मी (आज/एकूण)
कोयना 104/1974
नवजा 115/1779
महाबळेश्वर 95/1835
पाणी पातळी – (फूट इंचामध्ये)
(धोका पातळी/आत्ताची पातळी )
1)कृष्णा पूल कराड-(55.0)/ 12’7″
2) बहे पूल-(23.7)/8’08”
3) ताकारी पूल (46)/21’07”
4)भिलवडी पूल -(53)/22’6″
5)आयर्विन- (45)/18’0″
6)राजापूर बंधारा-(58)/33’2″
7) राजाराम बंधारा-(43′)/32’08”
पाणीसाठा (TMC)/विसर्ग (क्यूसेक्स मध्ये)
1) कृष्णा पूल कराड-18109
2) आयर्विन पूल -24700
3) राजापूर बंधारा- 82833
4) राजाराम बंधारा-33424
5) कोयना धरण- 66.46 TMC/1050
6)वारणा धरण- 27.96 TMC/4500
7)अलमट्टी धरण- 88.758 TMC
आवक – 112487
जावक-100670
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 11 Mar 2026 8:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची विधानपरिषदेत माहिती मुंबई । प्रवाशांना सक्षम प्रवासी सेवा देण्यासाठी राज्य परिवहन महा... Read more












































































