Last Updated on 26 Feb 2024 8:47 PM by Sanjay Patil/Adhorekhit
शेखर इमानदार : इस्लामपुरात ‘नमो चषक २०२४’ चे बक्षीस वितरण
सांगली । केंद्र व राज्य सरकार देशातील खेळाडूंना घडविण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. त्यातून अष्टपैलू खेळाडू घडत आहेत. विविध खेळातील खेळाडू आपले कर्तृत्व सिद्ध करत असून त्यांना सरकारी सेवेत रुजू करून घेत सरकार त्यांचा सन्मान करण्याचे काम करत आहे, असे प्रतिपादन भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र लोकसभा निवडणूक समन्वयक शेखर इनामदार यांनी केले.
इस्लामपूर येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व निशिकांतदादा स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘नमो चषक २०२४’ क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील (दादा) प्रमुख उपस्थित होते. नमो चषक अंतर्गत इस्लामपूर विधानसभा मतदार संघात एकूण १६ प्रकारच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
शेखर इनामदार म्हणाले, भाजपा युवा मोर्चा व निशिकांतदादा स्पोर्ट्स फाऊंडेशनने आयोजित केलेल्या ‘नमो चषक २०२४’ क्रीडा स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त इस्लामपूर विधानसभा मतदार संघात ६३ हजार स्पर्धक खेळाडूंनी नोंदणी करून आपले कौशल्य दाखवले. निशिकांतदादा स्पोर्टस फौंडेशनद्वारे या मातीत चांगले खेळाडू व संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम निशिकांत भोसले -पाटील यांच्या माध्यमातून होत आहे, हे गौरवास्पद आहे.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) म्हणाले, केंद्र सरकार खेलो इंडियासारख्या स्पर्धा आयोजित करुन देशातील प्रत्येक क्षेत्रातील खेळाचे महत्व वाढविले आहे. ग्रामीण व शहरी भागातील खेळाडू घडवित असताना अनेक अडचणी आहेत, सुविधांचा अभाव आहे. त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. इस्लामपुरात निशिकांतदादा स्पोटर्स फाउंडेशनच्या माध्यमातून उत्तम दर्जाचे खेळाडू घडत आहेत. भविष्यात या खेळाडूंना सर्वोतोपरी मदत करणार असुन देशपातळीवर व ऑलॅम्पिक सारख्या खेळात प्राविण्य मिळविणारे खेळाडुन या मतदार संघातुन व सांगली जिल्ह्यातुन घडतील.
यावेळी वाळवा पंचायत समितीचे माजी सभापती नेताजी पाटील म्हणाले इस्लामपुर विधानसभा मतदार संघात भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांच्या नेतृत्वाखाली सर्वच स्पर्धाचे नेटके नियोजन करण्यात आले होते.या स्पर्धाना मोठा प्रतिसाद मिळाला व ग्रामीण भागातील खेळाडुना प्रोत्साहान मिळाले,अशा स्पर्धाचे प्रत्येक आयोजन व्हावे.
स्वागत व प्रास्थाविक नमो चषक संयोजक अमोल खोत यांनी केले.आभार सत्याप्पा मोरे यांनी मानले.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष निवास पाटील, इस्लामपूर शहर भाजपा मंडल अध्यक्ष अशोक खोत, भाजपा जिल्हा क्रीडा प्रकोष्ट संयोजक अजित पाटील,निशिकांत दादा युथ फौंडेशन चे संस्थापक अक्षय पाटील,भाजपा ओबीसी सेल चे तालुका अध्यक्ष मधुकर हुबाले,भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अभिजीत पाटील,अक्षय मोरे, संघटन सरचिटणीस संदीप सावंत, इस्लामपूर शहर मंडल सरचिटणीस प्रविण परिट,युवा मोर्चा संघटन सरचिटणीस विश्वजित पाटील, सूरज घनवट,भाजपा जिल्हा उपाध्यक्षा आशाताई पवार, इस्लामपूर भाजपा मंडल उपाध्यक्षा स्मिता पवार, आरती खोत,संजय हवलदार,यांच्यासह सर्व खेळाडू, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नेटके नियोजन
गेल्या एक महिना या स्पर्धा इस्लामपुर विधानसभा मतदार संघातील विविध गावात पार पडल्या,मोठा प्रतिसाद खेळाडुंनी दिला.सर्व स्पर्धा अत्यंत पारदर्शी व खिलाडी वृत्तीने पार पडल्या यामुळे एका ही स्पर्धेत तक्रार अथवा वाद झाला नाही,सर्व स्पर्धाचे नेटके नियोजन केले होते. या स्पर्धामध्ये अनेक राज्य व देशपातळीवरील खेळाडु सहभागी झाले होते.यामुळे सर्व खेळाडुंनी संयोजकांचे विशेष आभार मानले.
पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त खेळाडुंची नोंदणी
नमो चषक निमित्ताने संपुर्ण देशभरातील विधानसभा क्षेत्रात या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या,यासाठी नमो चषक असे ॲप वर खेळाडुंनी आपली नोंदणी करायची होती यामध्ये इस्लामपुर विधानसभेतुन ६३ हजार खेळाडुंनी आपली नोंदणी केली होती.हि नोंदणी पश्चिम महाराष्ट्र प्रथम क्रमांकाची होती,यामुळे भाजपा परीवारातुन भाजपाचे जिल्हाध्यक्ष व इस्लामपुर विधानसभा निवडणुक प्रमुख निशिकांत भोसले- पाटील (दादा) व त्याच्या सर्व टिम चे अभिनंदन होत आहे.












































































