Last Updated on 13 Sep 2023 1:46 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्थ विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ‘क’ संवर्गातील कृषी सहायकांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
ही पदे कृषी सेवक म्हणून एकत्रित मानधनावर स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यासाठी पात्र उमेदवारांनी 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक र.शा. नाईकवाडी यांनी केले आहे.
कृषी आयुक्तालयाच्या 11 सप्टेंबर 2023 रोजीच्या जाहिरातीनुसार पात्र उमेदवारांनी www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत.अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याबाबतच्या सूचना,अर्ज करण्याचा कालावधी याबाबत सविस्तर माहिती वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे श्री. नाईकवाडी यांनी कळविले आहे.
कृषी सहाय्यक (सेवक) सरळ भरती आवेदन पत्र ऑनलाईन भरण्याबाबतच्या सूचना
गट-क संवर्गातील कृषी सेवक सरळसेवा पदभरती बाबतचा अभ्यासक्रम
विभागनिहाय एकूण पदे अशी :
नागपूर विभाग – 448 जागा
पुणे विभाग – 188 जागा
नाशिक विभाग – 336 जागा
औरंगाबाद विभाग – 196 जागा
लातूर विभाग – 170 जागा
कोल्हापूर विभाग – 250 जागा
कोकण ठाणे विभाग -294 जागा
अमरावती विभाग – 227 जागा














































































