Last Updated on 28 Jun 2025 5:02 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । ‘एक पेड माँ के नाम’ योजने अंतर्गत कामेरी येथील हुतात्मा विष्णू भाऊ बारपटे स्मारक, डॉक्टर बापूजी साळुंखे विद्यालय कामेरी व छगनबापू पाटील गर्ल्स हायस्कूल येथे सरपंच रणजीत पाटील,मंडल अधिकारी सी.ओ.तांबोळी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक दिलीप चरणे, यू.बी.जाधव तलाठी अशोक लोणीशके, संग्राम पाटील, भैरवदेव पद्धत संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील, कोतवाल अशोक ठोंबरे.व शालेय विद्यार्थीउपस्थित होते.पर्यावरण रक्षणासाठी शासनाच्या,शिक्षण,कृषी विभाग व महसूल विभागा मार्फत ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईच्या नावे एका झाडाचे वृक्षारोपण करावे असे आवाहन करण्यात आले आहे.







































































