Last Updated on 10 Nov 2024 6:35 PM by Sanjay Patil/Adhorekhit
यवतमाळ । काँग्रेसनं गेल्या ६० वर्षांत केवळ जातीयवादाचं विष कालवण्याचं काम केलं, अशी टीका केंद्रीय मंत्री-भाजपा नेते नितीन गडकरी यांनी केली आहे. ते आज यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड इथल्या प्रचारसभेत बोलत होते.
काँग्रेसनं सत्तेत असताना गरिबांच्या आणि गावांच्या हितासाठी विचार केला नाही, गरिबी हटाव ही घोषणा दिली. मात्र गरिबांची गरिबी हटली नाही… गरिबी हटली ती काँग्रेस नेत्यांची असा टोला त्यांनी लगावला. केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार येईपर्यंत अनेक गावात रस्ते नव्हते असं सांगून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत साडेतीन लाख गावात आपल्या सरकारनं रस्ते केल्याचं त्यांनी सांगितलं.
साभार : प्रसार भारती












































































