Last Updated on 05 Aug 2020 8:27 AM by
सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत मुख्य पूजा,भक्तीमय वातावरणात गजबजली अयोध्या
जे बोलले तेच करून दाखवले : राम मंदिराचा पाया घालून 29 वर्षानंतर पंतप्रधान मोदी अयोध्येत पोहचले
अयोध्या : अखेर ज्या क्षणांची लाखो रामभक्त वाट पाहात होते, तो क्षण पार पडला.अयोध्येत भक्तिमय वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन संपन्न झाले.12 वाजून 44 मिनिटे आठ सकंदांपासून 12 वाजून 44 मिनिटे आणि 40 सेकंद हा 32 सेकंदाचा मुहूर्त अतिशय शुभ,याच वेळेत पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.अयोध्येत सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राममंदिर ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्य गोपालदास हे उपस्थित होते.
बरोबर 12 वाजून 44 मिनिटे आठ सकंदांपासून 12 वाजून 44 मिनिटे आणि 40 सेकंद हा 32 सेकंदाच्या शुभमुहूर्तावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. सोशल डिस्टन्सिगचं पालन करत मुख्य पूजा त्याआधी पार पडली.

तत्पूर्वी,पंतप्रधानांनी हनुमानगढीत चांदीचा मुकुट अर्पण केला. एक प्रदक्षणा पूर्ण केली. त्यांनी साष्टांग दंडवत घालत दर्शन घेतले.हनुमानगढ़ी येथे पंतप्रधानांना चांदीचा मुकुट आणि हनुमान गदा भेट दिली.अयोध्येत सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे.राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी मुख्य मंचावर पंतप्रधान मोदींसह केवळ 5 जणांना स्थान देण्यात आलं आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि महंत नृत्यगोपालदास महाराज यांचा समावेश आहे.

12 वाजून 44 मिनिटे आठ सकंदांपासून 12 वाजून 44 मिनिटे आणि 40 सेकंद हा 32 सेकंदाचा मुहूर्त अतिशय शुभ, मोदी याच वेळात भूमिपूजन
राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी साडेअकाराच्या सुमारास अयोध्येत दाखल झाले. त्यांनी हनुमान गढीला जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी रामलल्लाला साष्टांग दंडवत घातला.














































































