Last Updated on 10 Apr 2025 3:33 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रताप सरनाईक हे एसटी महामंडळाचे २६ वे अध्यक्ष असणारं आहेत.
एसटीला भविष्यात आर्थिक दृष्ट्या सक्षम करून एक चांगली दर्जेदार परिवहन सेवा निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल तसंच जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.







































































