Last Updated on 13 Oct 2023 7:41 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । आम्ही गेल्या 2-3 महिन्यात या गळीत हंगामातील ऊसतोड आणि वाहतुकीचे काटेकोर नियोजन केले आहे.त्यामुळे यावर्षी ऊस तोडणीमध्ये फारशा तक्रारी राहणार नाहीत. तरीही काही अडचणी आल्या,तर माझ्याशी थेट संपर्क करावा. मी स्वतः लक्ष घालून त्या अडचणी सोडवेन,असा विश्वास राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी सभासद संपर्क दौऱ्यात बोलताना व्यक्त केला.
प्रतिकदादा पाटील यांनी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर पहिलाच सभासद संपर्क दौरा बिचुद,दुधारी,ताकारी या गावांतून सुरू केला. त्यांनी या दौऱ्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी थेट संवाद करीत त्यांच्या अडी-अडचणी समजून घेतल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीही तितक्याच उत्स्फूर्त पणे त्यांचे गावोगावी स्वागत केले. या दौऱ्यात कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील,सत्यविजय सहकारी बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार,माजी जि.प.अध्यक्ष देवराज पाटील,संचालक दादासो मोरे,मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील,ऊस विकास अधिकारी सुजय पाटील,गटाधिकारी अजित जाधव सहभागी झाले होते.
हेही वाचा – राजारामबापू कारखान्याच्या कामगारांसाठी आरोग्य योजना
प्रतिकदादा पाटील म्हणाले,गेल्या वर्षी आपण 1 हजार 116 ऊसतोड टोळ्यांशी करार केला होता. मात्र त्यातील 172 ऊस तोड टोळ्या आल्या नाहीत.त्यामुळे ऊसतोड व वहातुक यंत्रणा कमी पडली.काही शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागले.यावर्षी आम्ही गावनिहाय्य ऊस नोंदीप्रमाणे यंत्रणेचे नियोजन केले आहे. काही अडचण येणार नाही. मात्र आपण कोणासही पैसे देऊ नका. आमच्याकडे तक्रार करा,आम्ही आपले पैसे परत करण्याची व्यवस्था करू.
मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील यांनी प्रत्येक गावात गेल्या वर्षी किती यंत्रणा होती आणि यावर्षी किती वाढीव यंत्रणा दिली आहे,याची माहिती दिली.तर ऊस विकास अधिकारी सुजय पाटील यांनी प्रतिकदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना ऊस विकासासाठी राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी विविध प्रश्न,समस्या मांडल्या.प्रतिकदादा पाटील व अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
महानंदचे माजी अध्यक्ष विनायक पाटील, माजी सरपंच अर्जुन पाटील, सोसायटीचे अध्यक्ष राजाराम पाटील,संभाजी पाटील, शशिकांत पाटील,दिनकर सावंत,सागरू पाटील,रमेश पाटील,दुधारीमध्ये बँकेचे संचालक आनंदराव लकेसर,सरपंच नागेश कदम,उपसरपंच सागर पाटील,जीवन कदम, बिचुद येथे जेष्ठ कार्यकर्ते हरिभाऊ सावंत, माजी सरपंच बाळासाहेब पाटील, बाजार समितीचे संचालक शंकरराव मोहिते, माजी सरपंच भरत कदम,माजी उपसरपंच अशोक पाटील,सोसायटीचे अध्यक्ष सुभाष मोहिते, प्रकाश पाटील,सौरभ सावंत यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.









































































