Last Updated on 22 Jun 2023 9:33 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । कृष्णा नदीची उपसा बंदी ताबडतोब मागे घ्या.अन्यथा सांगली येथील पाटबंधारे विभागाला टाळे ठोकणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांनी दिला आहे.
भागवत जाधव म्हणाले की,पाटबंधारे विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे पाटबंधारे विभागाने आज उपसाबंदी लागु केली आहे.ती तातडीने मागे घ्यावी. सांगली,जिल्ह्यातील फक्त कृष्णा नदीवरील शेतीसाठी पाणी उपसा बंद केला आहे.अचानक पाणी उपसा बंद केल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे.शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची कल्पना नसताना अचानक उपसाबंदी जाहीर केली.भात पिकाची पेरणी झाली आहे आडसाली ऊस बियाणे तोडुन बियाणे शेतात मांडले असताना,पाण्याची गरज असताना पाण्याची मदत असताना अचानक उपसाबंदी लागु केली
पाटबंधारे विभागाने घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे.पाणी उपसा बंद करताना शेतकऱ्यांना मुदत द्यायला हवी होती.अचानक घेतलेल्या निर्णयामुळे भात व आडसाली ऊस पिकाचे नुकसान होणार आहे.शेतकऱ्यांनी भात पिकाची पेरणी केली आहे.पाऊस न पडल्यामुळे भात पिक करपुन जाणार आहे.काही भागात ऊस बियाणे लागण मांडून ठेवल्या आहेत.व अचानक उपसा बंदचा निर्णय झाल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे.
वेळेत पाणी नाही मिळाले तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येईल.याला जबाबादार कोण? निर्णय मागे न घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना.व शेतकऱ्यांना घेऊन पाटबंधारे विभागाला टाळे ठोक आंदोलन करणार असल्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे.
सातारा-कोल्हापूर जिल्ह्याला एक न्याय,सांगली जिल्ह्यातीत वेगळा न्याय
सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील उपसाबंदी लागु नाही.पण फक्त सांगली जिल्ह्यातील उपसाबंदी लागू केली आहे.पालकमंत्र्यांनी याची तात्काळ दाखल घ्यावी.












































































