Last Updated on 21 Jul 2023 7:11 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांची माहिती
सांगली । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस शनिवार दि. 22 जुलै रोजी संपूर्ण सांगली जिल्हया मध्ये सेवा दिवस म्हणून साजरा केला जाणार असल्याची माहिती सांगली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी दिली.
यावेळी बोलताना निशिकांत भोसले-पाटील म्हणाले,महाराष्ट्रातील रायगड जिल्हयातील इर्शाळवाडी येथे मोठी दुर्घटना घडली.यामध्ये अनेक लोकांचा मुत्यु झाला.या ठिकाणी राज्य शासनाकडून युध्दपातळीवर मदत कार्य सुरू आहे.राज्यातील अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाल्याने अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हे सर्व संकट व परिस्थिती लक्षात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस हा कोणतेही उत्साहाचे उपक्रम न राबविता भारतीय परंपरेमधील सेवा हि वृत्ती, भावना समजून हा वाढदिवस भाजपाच्या प्रत्येक पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी सेवादिवस म्हणून साजरा करावा.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमी सांगतात शेवटच्या माणसाचा विकास हे ध्येय आपले असले पाहिजे. सरकार पातळीवर अनेक योजनेच्या माध्यमातून सेवा घडत असते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली जिल्हयातील प्रत्येक मंडलामध्ये आरोग्य शिबीरे, कृत्रिक अवयवांचे वितरण,नेत्रदांनाचे अर्ज भरून घेतले जातील,गरिबांना चष्मा वाटप, अवयवदान मोहिमेला मदत करण्यासाठी सरकारी रूग्णालयात अवयवदानाच्या मान्यतेचे अर्ज भरून घेतले जातील,रक्तदान शिबीरे,महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर, मधुमेहींसाठी रक्ततपासणी शिबीर,वृध्दाश्रमात असलेल्या ज्येष्ठासाठी आरोग्य शिबीर, कानाची तपासणी, श्रवण यंत्राचे वितरण, वृध्दाश्रमात असलेल्या ज्येष्ठासाठी व्हीलचेअर, काठया आणि पुस्तकांचे वाटप,शालेय साहित्याचे वितरण, गरंजूना रेनकोट व छत्री वाटप असे सेवेचे उपक्रम सांगली जिल्यातील प्रत्येक मंडलामध्ये भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते राबणार असल्याची माहिती सांगली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी दिली.







































































