Last Updated on 26 Jun 2023 1:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । इस्लामपूर येथील एलआरपी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अॅण्ड पोस्ट ग्रज्युएट इन्स्टिट्यूट मधील अध्यापक,विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला.यावर्षी योगदिन राजारामबापू पाटील खुपे नाट्यागृह येथे साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपचे प्रवीण परीट,संजय पोरवाथ संदीपराज पवार,संजय हवलदार,दिनकर कोळेकर,अल्ताफ तहसीलदार,जयदीप निकम व अक्षय पाटील आदी उपस्थित होते.उद्घाटन प्राचार्य डॉ. विरेंद्र मिनकीरे,एनएसएस विभाग अधिकारी डॉ. राहुल नाकील,डॉ.गिरीगोसावी यांनी केले.
योगशिक्षक शशिकांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी व स्टाफनी योगाभ्यास केला. त्यानंतर योगासन स्पर्धा होण्यात आल्या.या स्पर्धेत प्रथम क्रमांक रत्नकांत काळे,द्वितीय क्रमांक प्रणिता थोरात व तृतीय क्रमांक रोहित लवटे यांनी मिळवला.
योगपिनानिमिन घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक ऐश्वर्या हिरेमठ,द्वितीय क्रमांक संतोषी शर्मा व तृतीय क्रमांक योगिता मोगल यांना मिळवला.तसेच पोस्टर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मेघा लाड,द्वितीय क्रमांक संजना कोळावले व तृतीय क्रमांक तन्वी मंडले यांनी मिळवला.
आंतरराष्ट्रीय योग दिन व कॉलेजचे समन्वयक,एनएसएस विभाग अधिकारी डॉ. राहुल नाकील,सहायक अधिकारी डॉ. खेता नोकील यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. प्राचार्य डॉ. विरेन्द्र मिनकरे यांचे मार्गदर्शन लाभले.






































































