Last Updated on 16 Aug 2023 3:41 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । जिल्हा भाजपाचे अध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर शहरांमध्ये ‘हर घर तिरंगा’ रॅली मोठया उत्साहात काढण्यात आली.यावेळी राष्ट्रीय तिरंगा ध्वज घेऊन भारत माता की जय,वंदे मातरम या घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गावरून मोटरसायकल रॅली काढण्यात आली.या रॅलीमध्ये युवकांसह अनेक जेष्ठ देशभक्त मोठया संख्येने सहभागी झाले होते.
‘हर घर तिरंगा अभियान 2’ या अभियानानिमित्त ही मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती.शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,यल्लामा चौक,गांधी चौक,संभाजी चौक,ब्राम्हणपुरी,गणेश मंडई,गांधी चौक,काळा मारूती चौक,एक नंबर शाळा,शिवाजी चौक,उरूण परिसर, रिंग-रोड,शाहूनगर, न्यायालय इमारत पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी सांगता झाली.
यावेळी स्वातंत्रलढयात ज्या क्रांतीकारांनी आपले बलिदान दिले,त्या क्रांतीकारकांचा इतिहास नव्या पिढीला ज्ञात व्हावा यासाठी प्रत्येक घरामध्ये व प्रत्येक तरूणाच्या मनामध्ये स्वातंत्र्य लढयाचा इतिहास जागला पाहिजे,रूजला पाहिजे यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य समजुन काम केले पाहिजे असा संदेश या तिरंगा रॅलीतून देण्यात आला.
फाळणी दिनानिमित्त मशाल मूक मोर्चा
15 ऑगस्ट 1947 रोजी अखंड भारत देशाची फाळणी झाली या निषेधार्थ इस्लामपूर शहरातुन मशाल मूकमोर्चा काढण्यात आला. या फाळणीमध्ये अनेक देशबांधवांना स्वःतचा जीव गमवावा लागला.यामध्ये देशाचे व देशभक्तांचे मोठे नुकसान झाले.पुन्हा अखंड भारत उभा करण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकांने चांगल्या व देशहिताच्या विचाराची कास धरणे आवश्यक आहे यापुढे अखंड भारत पुन्हा उभा करण्याचे स्वप्न प्रत्येकाने बाळगून एकविचार, एकवाक्यता, एकसंघपणा ठेवायला हवा असा संदेश या ‘मशाल मूक मोर्चा’ द्वारे देण्यात आला.यावेळी नगरपालिका आवारातील स्तंभाला अभिवादन करुन सांगता करण्यात आली.
यावेळी वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष धैर्यशील मोरे,इस्लामपूर भाजपाचे अध्यक्ष अशोकराव खोत,संघटन सरचिटणीस संदीप सावंत,प्रविण परीट,माजी नगरसेवक सुभाष शिंगण,संजय भागवत,राजेश मंत्री,वाळवा तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष मधुकर हुबाले,भाजपा शहर महीला अध्यक्षा कु.स्मिता पवार,गजानन फल्ले,युवा नेते आजित पाटील,अक्षय पाटील,संजय हवलदार,संदीपराज पवार,गौरव खेतमर,रणजित माने,वसंत कदम,अरूण शिंगण,सुनिल मदने,शरद अवसरे,विश्वजीत पाटील,सागर जाधव,कुलदीप खांबे,निळकंठ पाटील,रामभाऊ शेवाळे,आप्पा शिंदे आदीसह अन्य पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.












































































