Last Updated on 01 May 2023 3:01 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,सांगली यांचे निर्देशानुसार इस्लामपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात व सहकार न्यायालय,इस्लामपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत एकूण 436 प्रकरणात तडजोडी होवून 22 कोटी 30 लाख 84 हजार 437 रुपये एवढी रक्कम वसुल झाल्याची माहिती जिल्हा न्यायाधीश ए. एस.गांधी यांनी दिली.
इस्लामपूर येथील न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबित 273 प्रकरणे व दावा दाखलपूर्व 150 प्रकरणांमध्ये तडजोडी यशस्वी झाल्या.यामध्ये वाळवा तालुक्यातील विविध संस्था, राष्ट्रीयकृत बँक,सहकारी बँका,पतसंस्था, नगरपालिका,ग्रामपंचायती,तालुका मधील पोलीस स्टेशन यांनी सहभाग घेतलेला होता. सदर लोकअदालतमध्ये तालुक्यातील पक्षकारांनी मोठया संख्यने सहभाग नोंदवला व राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करणेस हातभार लावला.सदर लोकअदालत मध्ये ६ विवाह प्रकरणाची यशस्वी तडजोड झाली.

सदरहू लोकन्यायालयामध्ये पॅनेल प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश क्र. १ ए.एस.गांधी,दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर व्ही. जी. चौखंडे,सह दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर एम. एम. चितळे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर जे. जी. वाघ,तिसरे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर एम. एन. जयस्वाल,सहावे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर के. एम. चंडालिया,सातवे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर एच. पी. पांचोली यांनी काम पाहिले.तसेच पॅनेल सदस्य म्हणून अॅड.ए.डी.माळी,अॅड.किरण शामराव पाटील,अॅड.धनंजय एच. पाटील, अॅड.दिग्विजय दिलीप पाटील,अॅड. वैभव व्ही. बोंगाळे,अॅड. के. ए. मिरजकर यांनी काम पाहिले.सर्व न्यायालयीन कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.












































































