Last Updated on 18 Oct 2024 9:37 AM by Sanjay Patil/Adhorekhit
आचारसंहितेचा भंग केल्यास कडक कारवाई करणार; निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांचा इशारा
सांगली । विधानसभा निवडणुकीसाठी इस्लामपूर मतदार संघात २ लाख ७९ हजार ६९१ मतदार संख्या आहे. ६ हजार ४६१ मतदार वाढले आहेत. मतदार नोंदणी प्रक्रिया १९ ऑक्टोबर अखेर चालणार आहे. आचारसंहितेचा भंग केल्यास कडक कारवाई करण्यात येईल; असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन व सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार सचिन पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिला.
निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन व सहायक निवडणूक अधिकारी सचिन पाटील म्हणाले, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाची मतदार संख्या २ लाख ७९ हजार ६९१ आहे. पुरुष मतदार १ लाख ४१ हजार २१२, तर महिला मतदार १ लाख ३८ हजार ४७३ आहेत. तृतीयपंथी ६ मतदार आहेत. या निवडणुकीत ६ हजार ४६१ नवमतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार संघात ग्रामीण १९७, तर शहरी ९३ अशी २९० मतदान केंद्रे आहेत. तहसीलदार सचिन पाटील म्हणाले, निवडणुकीसाठी १५९५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. २६ क्षेत्रीय अधिकारी व १७ भरारी पथके नियुक्त आहेत. तहसील कार्यालयात निवडणूक कक्ष स्थापन केला आहे. नगरपालिकेत आचारसंहिता कक्ष व सर्व परवानग्या देण्यासाठी कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. मुख्याधिकारी आचारसंहिता कक्षाचे प्रमुख असतील. सर्वांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.
इस्लामपूर मतदारसंघ दृष्टिक्षेप
✪ एकूण मतदार २ लाख ७९ हजार ६९१
✪ पुरुष मतदार १ लाख ४१ हजार २१२
✪ स्त्री मतदार १ लाख ३८ हजार ४७३ तृतीय पंथी ६ मतदार आहेत.
✪ ज्येष्ठ मतदार ३ हजार ५८०, दिव्यांग मतदार २ हजार ५०२
✪ १८ ते १९ वयोगटातील ६ हजार ४६१
✪ एकूण मतदार केंद्र २९०, शहरी ९३
✪ ग्रामीण १९७ मतदार केंद्र आहेत.
हेही वाचा – सावधान! तुमच्या सोशल मिडीया खात्याची होत आहे निगराणी
एक खिडकी योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या परवानग्या या नगरपालिका येथे सभागृह मध्ये कार्यान्वित केलेल्या आचारसंहिता पथकामार्फत देण्यात येत आहेत. – SUVIDHA App किमान ४८ तास अगोदर परवानगी अर्ज करणे आवश्यक.
५० टक्के मतदान केंद्रावर CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
मतमोजणी/ स्ट्रॉगरूम केंद्राचे ठिकाण- शासकीय धान्य गोदाम, इस्लामपूर.
कर्मचारी नेमणूक :
कार्यालयीन १७ पथके ३३० कर्मचारी
मतदान केंद्रावर १५९५ कमर्चारी
क्षेत्रीय अधिकारी (Zonal Officer) – २६ + ४ राखीव = एकूण ३०
बीएलओ पर्यवेक्षक – २६
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) = २९०











































































