Last Updated on 16 Sep 2023 1:10 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । इस्लामपूर येथील प्रकाश पब्लिक स्कूल संघाची सपाक टाकरा या क्रीडाप्रकारात विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे . जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद सांगली द्वारा आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रकाश पब्लिक स्कूलच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला आणि त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .
श्रेया यादव,यशश्री पाटील,प्रांजली गायकवाड,त्रिशा शेट्टी,तनिष्का आंबर्डेकर यांनी संघासाठी उत्तम कामगिरी केली.
प्रकाश शिक्षण संकुलाचे संस्थापक श्री निशिकांत भोसले–पाटील,शाळेच्या प्रशासिका सौ सुनिता निशिकांत भोसले–पाटील,प्रकाश पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ- मधुकुमार नायर,उपप्राचार्या सौ.सिंधू नायर सर्व क्रीडा शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गानी अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या.








































































