Last Updated on 09 Feb 2024 7:35 PM by Sanjay Patil/Adhorekhit
शनिवारी आघाडीची युवा पार्श्वगायिका पलक मुछाल व पलाश मुछाल यांचा ‘दिलसे दिलतक’हा लाईव्ह ईन कॉन्सर्ट
रविवारी प्रसिध्द लावण्यवतींचा ‘रंगबाजी’ हा लावण्यांचा कार्यक्रम
सांगली । आविष्कार कल्चरल ग्रुपचा २२ वा संगीत महोत्सव आज व उद्या सायंकाळी ७ वाजता संपन्न होत असून संगीत महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शनिवारी हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीची युवा पार्श्वगायिका पलक मुछाल व पलाश मुछाल यांचा ‘दिलसे दिलतक’हा लाईव्ह ईन कॉन्सर्ट,तर रविवारी प्रसिध्द लावण्यवतींचा ‘रंगबाजी ‘हा लावण्यांचा कार्यक्रम होत आहे. माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित संगीत महोत्सवाचे उदघाटन युवा नेते प्रतिक पाटील यांच्या हस्ते होणार आहे. ‘आविष्कार’ परिवारातील ६ हजार कलारसिक या कार्यक्रमांचा आनंद घेणार आहेत.
इस्लामपूर येथील खा.एस.डी.पाटीलनगरमधील विद्यामंदीर हायस्कुलच्या प्रांगणात ६० बाय ३२ चा फूट भव्य कलामंच उभारला असून पिरजादे मंडप डेकोरेशन (वाळवा) यांनी देखणी मंडप व्यवस्था केली आहे. कला रसिकांची खुर्च्या व सोफा बैठक व्यवस्था केली आहे. सचिन नाईक (पुणे) यांची अद्यावत ध्वनी व्यवस्था असून बंटी अग्रवाल (कोल्हापूर) यांची प्रकाश व्यवस्था आहे. कलामंचावर १२ बाय ३० फुटाची एलईडी आणि बैठक क्षेत्रात २ एलईडीची व्यवस्था केली आहे.
माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांचे मार्गदर्शन आणि कला रसिकांच्या भक्कम पाठबळावर ‘आविष्कार’ गेल्या २१ वर्षाहून प्रदीर्घ काळ कार्यरत आहे. आविष्कारने ‘आकर्षक आयोजन आणि सूत्रबद्ध नियोजन’ हे सूत्र जपत ‘एक कौटुंबिक कला दालन’ निर्माण केले आहे. आविष्कारने गेल्या २१ वर्षात १०० पेक्षा अधिक दर्जेदार कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केलेले आहे.
आविष्कारचे मार्गदर्शक मोहन चव्हाण, अध्यक्ष सुनील चव्हाण,उपाध्यक्ष भूषण शहा, कार्याध्यक्ष प्रा.प्रदीप पाटील,सचिव विश्वनाथ पाटसुते,खजिनदार राजेंद्र माळी,सहसचिव विजय लाड,प्रा.कृष्णा मंडले,सतीश पाटील, विश्वास कदम,हर्षवर्धन घोरपडे,श्रेयस पाटील, सौरभ सावंत,विशाल पाटील,विजय नायकल, प्रताप कवठेकर यांच्यासह आविष्कारचे कार्यकर्ते हा संगीत महोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.







































































