Last Updated on 21 Dec 2024 7:37 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली | इस्लामपूर येथील आविष्कार कल्चरल ग्रुपच्या वतीने रविवार, दि.२२ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता हिंदी- मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचा युवा पार्श्व गायक ”नचिकेत लेले लाईव्ह ईन कॉन्सर्ट’ विथ अक्षता सावंत हा हिंदी-मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम खा.एस.डी.पाटील नगरातील विद्यामंदीर हायस्कुलच्या प्रांगणात होत आहे. हा या वर्षातील तिसरा म्हणजे शेवटचा कार्यक्रम आहे.
माजी मंत्री आ.जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आविष्कारने गेल्या २२ वर्षात सांस्कृतिक क्षेत्रात अधिराज्य गाजविले आहे. आविष्कारने बघता-बघता २२ संगीत महोत्सवाचे अतिशय प्रभावीपणे आयोजन केलेले आहे. राज्य,देशात नावलौकिक असणाऱ्या दिग्गज कलाकारांनी आविष्कार च्या संगीत महोत्सवास हजेरी लावलेली आहे.
आ.जयंत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त १८ व १९ फेब्रुवारी २०२४ रोजी २२ वा संगीत महोत्सव मोठया उत्साहात पार पडला आहे. या संगीत महोत्सवात पहिल्या दिवशी हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीची पार्श्वगायिका पलक मुचल आणि पलाश मुचल यांचा लाईव्ह ईन कॉन्सर्ट,तर दुसऱ्या दिवशी रसिकांच्या खास आग्रहावरून रंगबाजी हा लावण्यांचा बहारदार कार्यक्रम झाला आहे.
या कार्यक्रमात लावण्यवती मेघा घाडगे, सिने अभिनेत्री रुपाली भोसले,माधवी निमकर यांच्यासह लावण्यवतींनी बहारदार लावण्या सादर केल्या आहेत.
रविवारी होणारा कार्यक्रम हा २२ व्या संगीत महोत्सवातील शेवटचा कार्यक्रम आहे. नचिकेत लेले हा गुणी युवा पार्श्व गायक असून त्याने इंडियन आयडॉलमध्ये प्रभावी परफॉर्म सादर केलेला आहे. त्याने कमी कालावधीमध्ये देश व परदेशात ५० च्यावर कार्यक्रम सादर केलेले आहेत. अक्षता सावंत या ही युवा मराठी पार्श्व गायिका आहेत. या कार्यक्रमाचा आनंद कला रसिकांनी घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
आविष्कारचे मोहन चव्हाण, अध्यक्ष सुनील चव्हाण, कार्याध्यक्ष प्रा.प्रदीप पाटील, उपाध्यक्ष भूषण शहा, सचिव विश्वनाथ पाटसुते, सहसचिव विजय लाड, खजिनदार राजेंद्र माळी, माजी अध्यक्ष सतिश पाटील, प्रा.कृष्णा मंडले, सौरभ सावंत, विश्वास कदम, विनायक यादव, हर्षवर्धन घोरपडे, श्रेयस पाटील, प्रताप कवठेकर,हर्षवर्धन मोहिते यांच्यासह आविष्कारचे कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 14 Oct 2026 9:15 PM by Sanjay Patil/Adhorekhit आणखी चाळीस तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश, परीक्षा शुल्क सरसकट माफ होणार पिण्याचे पाणी, चाऱ्याची उपलब्धतेबाबत नियोजन; शेतकऱ्यांकडून वसूली... Read more








































































