Last Updated on 05 Oct 2024 11:28 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक समितीचे अध्यक्ष निवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील तहसीलदार कार्यालयात नुकतीच पार पडली. या बैठकीत निराधारांची १७३ प्रकरणे मंजूर करण्यात आली. बैठकीस तहसीलदार सचिन पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार प्रवीण कोटकर, वाळवा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, इस्लामपूर व आष्टा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत निराधारांच्या एकुण १७३ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये संजय गांधी निराधार योजना १०५ व श्रावणबाळ योजना ६८ प्रकरणांचा समावेश आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी दीड हजार रुपयांचे अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली. वाळवा तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थी शोधून त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सदस्यांनी विशेष प्रयत्न करावेत असे अवाहन अध्यक्ष निवास पाटील यांनी यावेळी केले.
या बैठकीस सदस्य उत्तम कदम, मुकुंद रास्कर, निलेश बाबर, निलेश कांबळे, वसंत कदम, रफिक (सरगम) मुल्ला उपस्थित होते.











































































