Last Updated on 16 Jul 2025 10:32 AM by Sanjay Patil/Adhorekhit
इस्लामपूर । डेहराडून (उत्तराखण्ड) येथे पार पडलेल्या ०१३५ इंडिया ओपन कंपीटिशन मध्ये इस्लामपूर येथील एस.डी पाटील शूटिंग रेंज चा 13 वर्षीय खेळाडू आरुष योगेश गोंदकर ला 25 मीटर स्पोर्ट्स पिस्टल जुनियर प्रकारात ३०० पैकी २७९ इत्का स्कोर करत सुवर्ण पदक पटकावले तर विरेन राहुल गिरिगोसावि याने ३०० पैकी २७२ इत्का स्कोर करत ८ वा क्रमांक पटकावला.
आरुष व विरेन दोघेही 10 मीटर मधुन मागिल वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले होते व सायलि सतीश कांबळे हिने 10 मीटर एयर पिस्टल वुमैन ३५३ व प्रणाली दीपक कांबळे हिने ३५५ इतका स्कोर करत या वर्षी होणाऱ्या राष्ट्रीय शूटिंग चैंपियनशिप साठी पात्र झाल्या. त्यांना शूटिंग प्रशिक्षक नईम मुबारक नरदेकर यांचे प्रशिक्षण लाभले.
एस.डी पाटील शूटिंग रेंज चे संस्थापक व वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटी चे सचिव ॲड.बी.एस.पाटील व सहसचिव ॲड..धैर्यशील पाटील, प्राचार्य डॉ.ए.एम. जाधव, दत्ता पाटील, प्रा. डॉ. हेमंत नारायणकर, संजय चरापले, संजय चव्हाण यांनी या सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.












































































