Last Updated on 20 Jul 2025 12:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । आपल्या जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या अभ्यासाच्या जोरावर इस्लामपूरचे राजेंद्र कृष्णा पाटील यांनी चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली आहे.
इस्लामपूर येथील इस्लामपूर हायस्कूलमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजेंद्र पाटील यांनी कोल्हापूरच्या विवेकानंद कॉलेजमधून ज्युनिअर कॉलेज आणि पुणे विद्यापीठातून बी.कॉम.पूर्ण केले. त्यांनी पुण्यातील नामांकित चार्टर्ड अकाउंटंट फर्ममध्ये आर्टिकलशिप पूर्ण केली.
इस्लामपूर येथील राजेंद्र पाटील यांचे वडील कृष्णा पाटील हे गेली ३५ वर्षे इस्लामपूर एस.टी. खात्यामध्ये कॅशियर पदावर काम करून निवृत्त झाले आहेत. पाटील यांचा भाऊ देखील पुण्यात चार्टर्ड अकाउंटंट म्हणून कार्यरत आहे.












































































