Last Updated on 14 Oct 2024 11:32 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहू – अशोकराव खोत
सांगली । गेल्या ३० वर्षापासून प्रलंबित असणारा इस्लामपूर शहरातील निशिकांतदादा कॉलनी, आंबेडकरनगर या रस्त्याचा प्रश्न भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांनी स्वखर्चातून मार्गी लावला आहे. यापुढेही निशिकांत भोसले-पाटील यांच्या माध्यमातून येथील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू,असे प्रतिपादन भाजपाचे शहराध्यक्ष अशोकराव खोत यांनी केले.
इस्लामपूर शहरातील निशिकांतदादा कॉलनी, आंबेडकरनगर येथील नंदकुमार कांबळे घर ते कांबळे भट्टी रस्त्याचे मुरमीकरण भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांच्या स्वखर्चातून करण्यात आला. या कामाचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
अशोकराव खोत म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरावस्थ झाली होती. या रस्त्यावरून ये-जा करताना नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. परंतु त्याकाळच्या सत्ताधाऱ्यांनी या प्रश्नी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. परंतु आता हा रस्ता निशिकांतदादांनी स्वखर्चातून पूर्ण केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यापुढे ही निशिकांतदादांच्या माध्यमातून आम्ही येथील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू.
यावेळी माजी नगरसेवक भास्कर कदम, प्रवीण परीट, अक्षय कोळेकर, जयपाल कांबळे, बाबासो गवंडी, जयकर कांबळे, विनय कांबळे, नितीन कांबळे, निखील कांबळे, ओंकार कुरणे, हरी कांबळे, धनाजी कांबळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









































































