Last Updated on 05 Feb 2023 2:17 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
रविवार १९ फेब्रुवारी रोजी आघाडीचे पार्श्वगायक सुदेश भोसले यांचा लाईव्ह इन कॉन्सर्ट’,
सोमवार २० फेब्रुवारी रोजी ‘युवा पार्श्वगायिका अन्वेषा दत्ता-गुप्ता यांचा लाईव्ह इन कॉन्सर्ट’
![]()
सांगली ।
आविष्कार कल्चरल ग्रुपने माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि.19 व सोमवार दि.20 फेब्रुवारी रोजी 21 व्या संगीत महोत्सवाचे आयोजन केले आहे.रविवारी ‘हिंदी सिने सृष्टीतील आघाडीचे पार्श्वगायक सुदेश भोसले यांचा लाईव्ह इन कॉन्सर्ट’,तर सोमवारी ‘युवा पार्श्वगायिका अन्वेषा दत्ता-गुप्ता यांचा लाईव्ह इन कॉन्सर्ट’संपन्न होत आहे.हे दोन्ही कार्यक्रम इस्लामपूर येथील विद्यामंदीर हायस्कुलच्या प्रांगणात सायंकाळी 7 वाजता होत आहेत.ही माहिती आविष्कारचे अध्यक्ष सुनील चव्हाण आणि सचिव विश्वनाथ पाटसुते यांनी दिली.
आघाडीचे पार्श्वगायक सुदेश भोसले यांनी खुदा गवाह,हम,तेजाब,तिरंगा,अजूबा, कभी खुशी कभी गम,करण-अर्जुन अशा कितीतरी लोकप्रिय चित्रपटांना अजरामर गाणी दिली आहेत. प्रख्यात सिने अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आवाज म्हणून त्यांची ओळख असून त्यांनी महान पार्श्वगायिका आशा भोसले यांच्यासह देश-विदेशात शेकडो कार्यक्रम केलेले आहेत. या कार्यक्रमात त्यांचा मुलगा सिध्दांत व त्यांचे सहकलाकारही गाणार आहेत.
अन्वेषा दत्ता-गुप्ता या नव्या पिढीतील आश्वासक चेहरा आहेत. त्यांनी गोलमाल रिटर्न,रांजना,प्रेम रतन धन पायो अशा लोकप्रिय हिंदी चित्रपटांना सुप्रसिध्द गाणी दिली आहेत. या दोन्ही कार्यक्रमात बहारदार हिंदी-मराठी गाणी होणार आहेत.
माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांचे मार्गदर्शन आणि कला रसिकांच्या भक्कम पाठबळावर ‘आविष्कार’ गेल्या 20 वर्षाहून प्रदीर्घ काळ कार्यरत आहे.आविष्कारने ‘आकर्षक आयोजन आणि सूत्रबद्ध नियोजन’ हे सूत्र जपत ‘एक कौटुंबिक कला दालन’ निर्माण केले आहे.आविष्कारने गेल्या 20 वर्षात पंडित जसराज,पद्मश्री पद्मजा फेंणाणी-जोगळेकर,सुरेश वाडकर,अभिजित भट्टाचार्य, अशोक हांडे, श्रेया घोषाल,उदित नारायण,शंकर महादेवन, साधना सरगम,कुमार शानू,जावेद अली,कुणाल गांजावाला,राहुल देशपांडे,जगदीश खेबुडकर,पद्मश्री विजय घाटे यांच्यासह 90 च्यावर कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करून राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे.आम्ही दरवर्षी 1200 कुटुंबांना वार्षिक सभासद करून त्यांना तीन कार्यक्रम देत आहोत. आमच्या कार्यक्रमांना 5-6 हजार कला रसिकांची उपस्थिती असते.आविष्कार ची ही सांस्कृतिक चळवळ अधिक गतिमान करण्यास सर्वांनी सढळ हातभार द्यायला हवा,अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
यावेळी आविष्कारचे प्रमुख मोहन चव्हाण,डी.बी.पाटील,उपाध्यक्ष भूषण शहा, कार्याध्यक्ष प्रा.प्रदीप पाटील,सहसचिव विजय लाड,खजिनदार राजेंद्र माळी,प्रा.कृष्णा मंडले,माजी अध्यक्ष सतिश पाटील,माजी कार्याध्यक्ष नजीर शेख,सचिन पाटील,राजवर्धन लाड,डॉ.अतुल मोरे,विकास कोरे,लव्हाजी देसाई,धनंजय भोसले,अजय थोरात,विश्वास कदम,किरण पाटील,अनिल पाटील,विश्वजित पाटील,सौरभ सावंत यांच्यासह आविष्कारचे सदस्य उपस्थित होते.
![]()












































































