Last Updated on 11 Oct 2023 3:15 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर । राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आयोजित इंग्लिश वक्तृत्व स्पर्धेत येथील छत्रपती राजे संभाजी विद्यालयाचा दुसरीचा विद्यार्थी शौर्य रविकिरण सरदेसाई याने द्वितीय क्रमांक मिळवला.
कोल्हापूर शहरस्तरीय इंग्लिश वक्तृत्व स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.विजेत्यांना डॉ. सुनीलकुमार लवटे,समितीचे राज्यप्रमुख सुधाकर सावंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले.गटनिहाय विजेते अनुक्रमे असे,
इयत्ता पहिली : सर्वेशू वागरे, विहान भापकर, अनुश्री कळंत्रे. दुसरी : कुंजल देशमुख, शौर्य सरदेसाई, ओम कुंभार व अनविश लोखंडे. तिसरी : शांभवी देशपांडे, कार्तिकी गव्हाणे, स्वरा रेपे. चौथी : संस्कार पाटील, आस्था तुकारे, जान्हवी शिंदे. पाचवी : स्वरांजली घाटगे, परिणीती केकतपुरे, प्रणव ओंकार. सहावी : लावण्या कोराणे,तनिष्का पाटील,आर्या चराटे आणि मसीरा पठाण. सातवी : श्रावणी मेधावी, समीक्षा अलगुडे, श्रेया हैबती.
परीक्षक म्हणून चारुलता पाटील,अबोली देशपांडे,श्रुती कुलकर्णी,अक्षय गुरव,शर्मिन कागदी,निशा साळवी,ज्योती देसाई,पूनम हिरेमठ, मानसी माने,सोमनाथ जाधव,हावळ यांनी काम पाहिले.







































































