Last Updated on 21 Aug 2023 3:01 PM by Sanjay Patil/Adhorekhit
India Squad for Asia Cup 2023 । आशिया कप 2023 साठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे.निवड समिती आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात आज येथे बैठक पार पडली.या बैठकीनंतर निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषदेत आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली.केएल राहुल आणि श्रेयस अय्यर संघात परतले आहेत.सोबतच युवा फलंदाज तिलक वर्माला संघात देण्यात आली आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आशिया कप स्पर्धेत उतरणार असून हार्दिक पांड्यावर उपकर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संजू सॅमसनला बॅकअप म्हणून ठेवण्यात आले आहे.
आशिया चषक 30 ऑगस्टपासून सुरू होत आहे.निवड समितीने 18 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे.17 खेळाडूंचा संघ असून संजू सॅमसन बॅकअप यष्टिरक्षक (18 वा खेळाडू) असेल.युझवेंद्र चहलला संघातून वगळण्यात आले आहे.श्रेयसने शेवटचा वनडे सामना 15 जानेवारी 2023 रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळला होता.त्याच वेळी,राहुलने 22 मार्च रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला.श्रेयसच्या मांडीला दुखापत झाली होती,तर राहुल मांडीच्या दुखापतीने आयपीएलमधून बाहेर पडला होता.या दोघांच्या पुनरागमनामुळे भारतीय मधली फळी मजबूत झाली आहे.
हेही वाचा – चांद्रयान-3 चे 23 ऑगस्ट रोजी ‘सॉफ्ट लँडिंग’, या प्लॅटफॉर्मवर होणार थेट प्रक्षेपण !
विश्वचषकाच्या विपरीत,आशिया चषकाचे नियम 17 सदस्यीय संघाला परवानगी देतात.बांगलादेश आणि पाकिस्तानने 17 सदस्यीय संघ निवडले आहेत. यंदा आशिया चषक पाकिस्तान-श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. पहिला सामना 30 ऑगस्ट रोजी मुलतान येथे पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे.या स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार असून त्यात 6 संघ सहभागी होणार आहेत. या सहा संघामध्ये भारत,पाकिस्तान,श्रीलंका,बांगलादेश,नेपाळ आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे. याअगोदर या कपसाठी पाकिस्तान,श्रीलंका आणि नेपाळने संघ जाहीर केले आहे.त्यानंतर आता भारताचा संघ जाहीर झाला आहे.
आशिया चषक स्पर्धेसाठी भारताचा संघ :
रोहित शर्मा (कर्णधार),शुभमन गिल,हार्दिक पांड्या,विराट कोहली,केएल राहुल (यष्टीरक्षक),श्रेयस अय्यर,रवींद्र जडेजा,जसप्रीत बुमराह,मोहम्मद शमी,मोहम्मद सिराज,कुलदीप यादव,इशान किशन (यष्टीरक्षक),अक्षर पटेल,शार्दुल ठाकूर,सूर्यकुमार यादव,तिलक वर्मा,प्रसिद्ध कृष्णा,संजू सॅमसन (राखीव).
आशिया चषकाचे वेळापत्रक पाहा
| तारीख | फेरी | सामना | ठिकाण |
| 30 ऑगस्ट 2023 | 1 | पाकिस्तान vs नेपाळ | मुल्तान, पाकिस्तान |
| 31 ऑगस्ट 2023 | 1 | बांगलादेश vs श्रीलंका | कँडी, श्रीलंका |
| 2 सप्टेंबर 2023 | 1 | पाकिस्तान vs भारत | कँडी, श्रीलंका |
| 3 सप्टेंबर 2023 | 1 | बांगलादेश vs अफगाणिस्तान | लाहोर, पाकिस्तान |
| 4 सप्टेंबर 2023 | 1 | भारत vs नेपाळ | कँडी, श्रीलंका |
| 5 सप्टेंबर 2023 | 1 | श्रीलंका vs अफगाणिस्तान | लाहोर, पाकिस्तान |
| 6 सप्टेंबर 2023 | 2 (सुपर – 4) | A1 vs B2 | लाहोर, पाकिस्तान |
| 9 सप्टेंबर 2023 | 2 (सुपर – 4) | B1 vs B2 | कँडी, श्रीलंका |
| 10 सप्टेंबर 2023 | 2 (सुपर – 4) | A1 vs A2 | कँडी, श्रीलंका |
| 12 सप्टेंबर 2023 | 2 (सुपर – 4) | A2 vs B2 | दांबुला, श्रीलंका |
| 14 सप्टेंबर 2023 | 2 (सुपर – 4) | A1 vs B1 | दांबुला, श्रीलंका |
| 15 सप्टेंबर 2023 | 2 (सुपर – 4) | A2 vs B2 | दांबुला, श्रीलंका |
| 17 सप्टेंबर 2023 | फायनल | S4 1 vs S4 2 | कोलंबो, श्रीलंका |












































































