Last Updated on 19 Nov 2023 11:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
World Cup 2023 : भारताचा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियाला दिलासा दिला आहे.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी आज भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक केले.
विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यापुर्वीचे सर्व सामने जिंकल्यानंतर अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागल्यानंतर,पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले :
“प्रिय टीम इंडिया,
विश्वचषक स्पर्धेत तुमची कामगिरी आणि जिद्द वाखाणण्याजोगी होती. तुम्ही उत्तम खेळ करत देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली.
आम्ही आज आणि सदैव तुमच्या सोबत आहोत.”












































































