Last Updated on 03 Sep 2024 10:10 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । महाराष्ट्र विधिमंडळाच्या राष्ट्रकूल संसदीय मंडळाकडून देण्यात येणारा उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार आमदार सदाभाऊ खोत यांना विधान भवन, मुंबई येथे देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आदी उपस्थित होते.
विधिमंडळाच्या कामकाजातील नियमित सहभाग, संसदीय परंपरा, शिष्टाचार यांची जाण, विधिमंडळाच्या नियमांचे काटेकोर पालन, उपस्थिती, विधिमंडळात प्रश्न, विषय मांडताना वापरलेले कौशल्य, वक्तृत्व शैली, संसदीय भाषणे या सगळ्या बाबी पडताळून या पुरस्कारांसाठी नेमलेल्या तज्ञ समितीकडून संबधित आमदाराची यासाठी शिफारस केली जाते. त्यानंतर राष्ट्रकुल संसदीय मंडळाकडून हे पुरस्कार जाहीर केले जातात.









































































