Last Updated on 20 Dec 2023 11:02 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । युवकांनी सामाजिक कार्यात अग्रेसर राहून गावच्या विकासात योगदान द्यावे. गावात उभारण्यात आलेला सेल्फी पाँईट हा गावाच्या सौंदर्यात भर टाकणारा आहे,असे मत राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी व्यक्त केले.
कापूसखेड ता.वाळवा येथे प्रविण शहाजी पाटील व विश्वनाथ पाटील यांनी उभारलेल्या ‘आपलं कापूसखेड’ या सेल्फी पाँईटच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी उपसरपंच युवराज पाटील,वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रविण पाटील,राजारामबापू बँकेचे माजी संचालक जगन्नाथ स्वामी, सिध्दनाथ पाणीपुरवठयाचे अध्यक्ष धनाजी देसाई, माणिकराव पाटील, संपतराव पाटील,दिपक देशमुख,मोहित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी प्रविण पाटील व विश्वनाथ पाटील यांच्याहस्ते प्रतिक पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
प्रतिक पाटील म्हणाले,गावातील युवकांनी एकत्रित येवून विविध घटकांना न्याय देण्याचे काम करावे.उद्योग -व्यवसाय उभारणा-या नव उद्योजकांना सहकार्य करावे.शेतक-यांसाठी विविध मार्गदर्शन शिबीरे घेण्यात यावीत.यासाठी आमच्याकडून पुर्ण सहकार्य करू,असे आश्वासन प्रतिक पाटील यांनी दिले.
यावेळी पाणीपुरवठयाचे संचालक जयसिंगराव पाटील,डॉ. शुभम पाटील,अभिजित पाटील,पृथ्वीराज मोकाशी,अमर पाटील,राजेंद्र पवार,अनिल जाधव,सुयोग पाटील,गौरव नांगरे-पाटील, महादेव पाटील,चंद्रकांत पाटील,ऋतुराज धुमाळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.










































































