Last Updated on 05 Oct 2023 8:36 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्यावतीने (ICC) एकदिवसीय विश्वचषक 2023 ला आजपासून प्रारंभ होत आहे. ही स्पर्धा भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे.पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.2019 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत हे दोन संघ आमनेसामने आले होते.हे दोन्ही संघ ५ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर स्पर्धेतील पहिला सामना खेळणार आहेत.
स्पर्धेतील पहिला सामना गेल्या हंगामातील वर्ल्डकप विजेते इंग्लंड आणि उपविजेते न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम (मोटेरा स्टेडियम) दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आला आहे.आयसीसी वनडे वर्ल्ड कपमधील सर्व सामने हे एकूण भारतातील 10 शहरांमधील स्टेडियममध्ये पार पडणार आहेत.
एकूण नऊ सामन्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महान सामना आता 15 ऑक्टोबरला नाही तर 14 ऑक्टोबरला होणार आहे.
या सामन्यांच्या वेळापत्रकात बदल
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील आठ सामन्यांची तारीख बदलण्यात आली आहे, मात्र एका सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आता 15 ऑक्टोबर ऐवजी १४ ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे 14 ऑक्टोबरला होणारा इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना 15 ऑक्टोबरला होणार आहे. पाकिस्तान-श्रीलंका सामना आता 12 ऑक्टोबरऐवजी 10 ऑक्टोबरला होणार आहे.ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना 13 ऑक्टोबर ऐवजी 12ऑक्टोबरला होणार आहे.न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील सामना 14 ऑक्टोबर ऐवजी 13 ऑक्टोबरला होणार आहे. धर्मशाला येथे इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यातील सामना दुपारऐवजी सकाळी 10.30 वाजता सुरू होईल. भारत-पाकिस्तान व्यतिरिक्त टीम इंडियाचा नेदरलँड्सविरुद्धचा सामनाही बदलण्यात आला.
म्हणून तारखेत महत्त्वपूर्ण बदल
आधीच्या वेळापत्रकानुसार, भारत-पाकिस्तान सामन्याचा दिवस 15 ऑक्टोबर हा नवरात्रीचा पहिला दिवस होता. गुजरातमध्ये हा दिवस रात्रभर गरबा नृत्याने साजरा केला जातो. सुरक्षा यंत्रणांनी सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयला सामना इतर तारखेला हलवण्याचा सल्ला दिला होता. यानंतर आयसीसी आणि बीसीसीआयने पाकिस्तान संघाच्या दोन गट सामन्यांच्या तारखेत बदल करण्याबाबत पीसीबीशी चर्चा केली. पाकिस्तानने याला सहमती दर्शवली आणि आता हा महान सामना 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
वर्ल्डकपमधील भारतीय संघाचे वेळापत्रक
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई, 8 ऑक्टोबर.
भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली, 11 ऑक्टोबर.
भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद, 14 ऑक्टोबर.
भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे, 19 ऑक्टोबर.
भारत विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाळा, 22 ऑक्टोबर.
भारत विरुद्ध इंग्लंड, लखनऊ, 29 ऑक्टोबर.
भारत विरुद्ध श्रीलंका, मुंबई, 2 नोव्हेंबर.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता, 5 नोव्हेंबर.
भारत विरुद्ध नेदरलँड्स, बंगळुरु, 12 नोव्हेंबर.
वर्ल्डकपसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.












































































