Last Updated on 11 Oct 2024 9:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit
Sayaji Shinde Join Ajit Pawar NCP : अभिनय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली या परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल असे दिग्गज नेते उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत अभिनेता सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.सयाजी शिंदे यांच्या पक्षप्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुरुवातीला त्यांचं स्वागत केलं.
अजित पवारांची मोठी घोषणा
यावेळी अजित पवार यांनीदेखील भूमिका मांडली. ‘मी चित्रपट पाहत नाही पण सयाजीराव यांचे अनेक चित्रपट बघितले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत अनेक सामाजिक कामात त्यांची माझी भेट झाली. मुळात सयाजीरावांना झाडाची आवड आहे. सह्याद्री देवराई याच्या माध्यमातून राज्यभर वृक्षारोपण करतात. त्यांचं मोठं काम आहे. साईबाबांचा प्रसाद, सिद्धीविनायक बाप्पाचा प्रसाद दिला जातो तसा प्रसाद म्हणून रोपटं दिलं जावं असं आम्हाला त्यांनी सांगितलं. अशा विषयावर चर्चा करत असतो. सयाजीराव राज्यभर पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करतील’, अशी घोषणा अजित पवारांनी यावेळी केली.







































































