Last Updated on 05 Aug 2020 6:44 AM by
भूमिपूजनाच्या आधीच अयोध्येत दिवाळी, योगींनी फटाके फोडले
नवी दिल्ली : आज अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. या भूमीपूजन सोहळ्यात श्रीरामांच्या भव्य मंदिराच्या भूमीपूजनासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास यांनी सांगितलं की, राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी 40 किलो चांदीची विट दान म्हणून देण्यात आली आहे.आज (बुधवार 5 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 12 वाजून 44 मिनिटांच्या मुहूर्तावर भूमिपूजन होणार आहे. यासाठी पंतप्रधान मोदी सकाळी साडेनऊच्या सुमारास दिल्लीतून अयोध्येकडे रवाना झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या विटेचा उपयोग अयोध्येत होणाऱ्या भूमीपूजन सोहळ्याच्या पायाभरणीसाठी करणार आहेत. दरम्यान, सोहळ्यानंतर ही वीट लॉकरमध्ये ठेवण्यात येणार आहे.असं सांगितलं जात आहे की, महंत नृत्य गोपाळ दास यांनी मणि राम दास छावनी पीठ यांच्यातर्फे राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी 40 किलोची चांदीची विट दान म्हणून देण्यात आली आहे.दरम्यान, राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी देशभरातून अनेकांनी चांदीच्या विटा पाठवल्या आहेत.
प्रस्तावित राम मंदिर हे 161 फूट उंच असून त्याला 5 घुमटाकार शिखरं असणार आहेत. राम मंदिर परिसर आणि सर्व अयोध्येच्या विकासाचा नकाशा तयार केला जात आहे.या भूमिपूजन आणि पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदींसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत.या भूमिपूजन आणि पायाभरणीच्या कार्यराम जन्मभूमी तीर्थ न्यासाचे पदाधिकारी आणि इतर काही संत महंत यांच्यासह 200 लोक या कार्यक्रमाला 5 ऑगस्टला उपस्थित राहतील, असा अंदाज आहे.
मंदिर उभारणीतले जाणकार असलेल्या राजस्थानातल्या मजुरांना या कामासाठी नेमलं जाणार आहे. 250 कामगार साडेतीन वर्षांत मंदिर उभारतील, अशी अपेक्षा आहे.चंद्रकांत सोमपुरा या 80 वर्षांच्या जाणअयोध्येच्या राम मंदिराला 5 शिखरं असतील आणि मंदिराची उंची 160 फूट असेल.काराला मंदिर उभारणीचं काम सोपवण्यात आलं आहे.सोमपुरा यांनी गुजरातचं अक्षरधाम, मथुरेचं कृष्ण जन्मस्थान अशी 130 मंदिरं बांधली आहेत.
सुप्रीम कोर्टात 16 ऑक्टोबरला अयोध्या प्रकरणी सुनावणी संपली आणि 9 नोव्हेंबर 2019 ला ऐतिहासिक निर्णय देण्यात आला. तेव्हापासून मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.राम मंदिराच्या उभारणीची जबाबदारी आहे त्याचं नाव श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट असं आहे.
भूमिपूजनाच्या आधीच अयोध्येत दिवाळी, योगींनी फटाके फोडले
अयोध्येत आज (5 ऑगस्ट) होणाऱ्या राममंदिर भूमिपूजनाच्या एक दिवस आधीच रामनगरीत दिवाळीचा उत्साह होता. संपूर्ण अयोध्या दिव्यांच्या झगमगाटाने उजळून निघाल्याचं पाहायला मिळालं.मंगळवारी रात्री (4 ऑगस्ट) सर्वात आधी रामजन्मभूमिवर दिवा लावण्यात आला. यानंतर संपूर्ण रामनगरीत दिव्यांची रोषणाई झाली आणि त्या प्रकाशात अयोध्या न्हावून निघाली.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील लखनौमधील आपल्या निवासस्थानी दिवे लावून आनंद साजरा केला.योध्यावासीयांनी आपल्या घरांबाहेर रांगोळी काढली. प्रत्येक मंदिरामध्ये रामचरित मानस आणि दोह्यांचं गायन करण्यात आलं.नेक ठिकाणी लोक या सर्व सुंदर सोहळ्याचे क्षण टिपण्यासाठी सेल्फी घेत असल्याचंही दिसलं. सुरक्षा व्यवस्थेमुळे या भागातील दुकानं बंद आहेत. या भागात सरकारी गाड्यांचीच संख्या अधिक असून त्याच फिरताना दिसत आहे. हनुमान गडीत प्रवेशाच्या ठिकाणी लावण्यात आलेले बॅरिकेट्स देखील हटवण्यात आले आहेत.













































































