Last Updated on 25 Dec 2025 6:37 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । कृष्णा कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद व हुबालवाडी (ता.वाळवा) येथील प्रगतशील शेतकरी प्रदीप बाबासो नांगरे यांना खोडवा हंगामासाठी कै. अण्णासाहेब शिंदे राज्यस्तरीय ऊस भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख १ लाख रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र असे पुरस्कारांचे स्वरूप असून, लवकरच या पुरस्कारांचे वितरण पुणे येथे केले जाणार आहे.
साखर क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट औद्योगिक व आर्थिक कामगिरी यासाठी दरवर्षी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे पुरस्कार जाहीर केले जातात. यंदाच्या पुरस्कारांची अधिकृत घोषणा संस्थेतर्फे करण्यात आली आहे.
या यशाबद्दल कृष्णा कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक, शेतकरी सभासद, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

त्याचबरोबर हुबालवाडी गावातील विविध संस्थेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी त्यांचा शाल व श्रीफळ बुके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बहे सेवा सोसायटीचे चेअरमन अविष्कार नांगरे, माजी उपसरपंच सुभाष नांगरे, बाबासो नांगरे, शिवाजी अनुसे, कृष्णा नांगरे, डॉ.स्वप्नील नांगरे, संदीप नांगरे, सचिन पुजारी, संदीप नांगरे, कुबेर नांगरे, अरुण नांगरे, धनंजय हुबाले, सुरज नांगरे, धनाजी नांगरे, सागर नांगरे आदी उपस्थित होते.














































































