Last Updated on 26 Sep 2021 3:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
जगातील 9 वे आश्चर्य माहित आहे का? चीनमधील एका डोंगराच्या कड्यावर बांधलेल्या रस्त्याला जगातील 9 वे आश्चर्य बनण्याचा मान मिळाला आहे.
गुओलियांग डोंगराच्या कड्यावर बांधलेला हा रस्ता समुद्रसपाटीपासून 1 हजार मीटर उंच व 1.2 किलोमीटर लांब आहे. त्याच्या अवघड व धोकादायक बांधकामामुळे त्याचा समावेश आश्चर्यांमध्ये केला आहे.
चीनमधील हेनान प्रांताच्या हुक्षियान काऊंटी येथे हे गुओलियांग गाव आहे. हे गाव जगापासून वेगळे पडले आहे. या डोंगरावरून खाली येण्यासाठी गावकऱ्यांना तीव्र चढ-उतार असलेली दरी ओलांडावी लागत असे.
असा बनला रस्ता :
- स्वतः गावकऱ्यांनी 1972 मध्ये रस्ता खोदण्याचा निर्णय घेतला. शेन मिंगक्षिन या गावकऱ्याच्या नेतृत्वाखाली रस्ता खोदकामास सुरूवात केली. कसलेही प्रशिक्षण नसल्याने या रस्त्याचे बांधकाम अत्यंत घटक होते.
- काम सुरु असताना काही जणांना जीवही गमवावा लागला. शेवटी 1977 मध्ये रस्त्याचे काम पूर्ण झाले. आज हा रस्ता पर्यटन केंद्र बनला आहे.














































































