Last Updated on 02 Dec 2021 5:08 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कर्ज मिळवण्यासाठी तुमचा सिबिल स्कोअर सर्वात महत्वाच्या गोष्टींपैकी एक आहे.गृहकर्ज, वाहन कर्ज,वैयक्तिक कर्ज किंवा इतर कोणत्याही प्रकारचे कर्ज असो,बँका नेहमी एखाद्या व्यक्तीचा सिबिल स्कोअर तपासतात. याला क्रेडिट स्कोर असेही म्हणतात. ज्यामध्ये कर्जदाराचा आर्थिक रेकॉर्ड उपलब्ध असतो. कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरच्या मदतीने बँका कर्जाची परतफेड वेळेवर करतात की नाही हे पाहतात.सिबिल स्कोअरद्वारे,एखादी व्यक्ती कोणत्याही कर्जाच्या देयकामध्ये डिफॉल्ट झाली आहे की नाही हे तपासू शकते किंवा त्याने कोणताही EMI भरला नाही, हे बँकांना कळते.
सर्वप्रथम,आपण सिबिल (क्रेडीट इन्फर्मेशन ब्युरो (इंडि या) लिमिटेड) काय आहे याबद्दल थोडी माहिती घेऊया.सिबिल ही भारतातील एक अग्रणी क्रेडीट रेटिग एजन्सी आहे जी आपल्या क्रेडीटची माहिती दर्शवते.सिबिलमुळे,कोणीही सहजपणे म्हणू शकते की भारत हा आर्थिकदष्ट्या साक्षर राष्ट्र आहे.जोखीम मॅनेज (व्यवस्थापन करण्यासाठी) आणि बुडीत कर्जांवर नियत्रंण ठेवण्यासाठी तसेच वित्तीय संस्था आणि व्यवसायांमध्ये जागरूकता पसरविण्यासाठी, वित्तीय बाजारपेठा अधिक पारदर्शक,विश्वासार्ह आणि संरचित करण्यासाठी सिबिलन महत्वपूर्ण काम केले आहे.
सिबिलची तपासणी ऑनलाइन केली जाते.आपण सिबिल स्कोअर कसे तपासायचे याचे सर्व स्टेप्स पाहूया,
कोणतेही कर्ज देण्यापूर्वी बँक आणि वित्तीय संस्था सिबिल स्कोअरची तपासणी करतात.
सिबिल एक क्रेडिट स्कोअर तयार करते जी साधारणत: ३०० व (ते )९०० च्या दरम्यानची ३ अंकी संख्या असते.३०० पेक्षा कमी स्कोअर कमकुवत तर ९०० पेक्षा अधिक स्कोअर खूप चांगला मानला जातो.
दर महिन्याला,विविध बँक आणि एनबीएफसी कित्येक व्यक्ती आणि व्यवसायांकरिता सिबिल स्कोअर तपासण्यासाठी अहवाल सादर करतात.याद्वारे त्यांना योग्य ग्राहकांची निवड करण्यास आणि सध्याच्या ग्राहकांच्या परतफेडीच्या पद्धतींचे परीक्षण करण्यास मदत होते.
जेव्हा बँक आणि वित्तीय संस्था क्रेडिट स्कोअरची तपासणी करतात तेव्हा हे स्कोअर 700 च्यावर असले पाहिजे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
आता,स्वतःचे सिबिल स्कोअर तपासण्याच्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करूया.निश्चितच,आतापर्यंत आपल्याला समजले असेलच की क्रेडिट स्कोअर आणि सिबिल म्हणजे काय आहे.
तर क्रेडिट स्कोअर कसा चेक (तपासायचा )करायचा?
सिबिल स्कोअर तपासण्यासाठी आम्ही खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करा,
क्रेडिट स्कोअर विनामूल्य कसा तपासायचा :
![]()
जानेवारी २०१७ पासून भारतीय रिझर्व्ह बँकने असे आदेश दिले आहेत की परवाना असलेल्या चारही क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या तुम्हाला ऑनलाइन क्रेडिट स्कोअर तपासू देऊ शकतील आणि दरवर्षी एक विनामूल्य क्रेडिटचा स्कोअर आणि क्रेडिट रिपोर्ट देतील.
वर्षातून एकदा विनामूल्य सिबिल अहवाल कसा मिळवायचा याची माहिती खालीलप्रमाणे
स्टेप १ : सिबिल वेबसाइटवर जा
स्टेप २ : दिलेला फॉर्म भरा ज्यात आपले नाव,संपर्क क्रमांक,ईमेल ऍड् रेस आदी( इत्यादी )आवश्यक माहिती भरणे आवश्यक आहे आणि पुढे जा
स्टेप ३ : आपल्या पॅन नंबरसह आपल्याबद्दलची अतिरिक्त माहिती भरा.पुढील चरणात जाण्यासाठी आपले पॅनची अचूक माहिती दिल्याचे सुनिश्चित करा.
स्टेप ४ : आपल्या कर्ज आणि क्रेडिट कार्डसंदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरे द्या,ज्यावर आधारित आपल्या सिबिल स्कोअर ची गणना केली जाईल आणि आपला पूर्ण क्रेडिट अहवाल तयार केला जाईल.
सिबिल स्कोअर तपासण्यासाठी हे चार मुख्य स्टेप्स आहेत
परंतु, वर दिलेल्या स्टेप्सच्या पुढे खालील काही स्टेप्स येतात,
स्टेप ५ : आपल्याला विविध पेड सबस्क्रिप्शन सुचविल्या जातील (जर आपल्याला एका वर्षात एकापेक्षा जास्त अहवालाची आवश्यकता असेल तर). आपणास फक्त एक-वेळ, विनामूल्य क्रेडिट स्कोअर आणि अहवाल आवश्यक असल्यास पेजच्या तळाशी ‘नाही, धन्यवाद’ निवडून पुढे जा.
यावेळी आपले खाते तयार के ले जाते आणि पुढील पेजवर एक कन्फर्मेशनचा संदेश दर्शविला जातो.
स्टेप ६ : स्टेप २ मध्ये तयार केलेला आपला लॉगिन आणि पासवर्ड वापरुन आपण आपल्या खात्यात लॉगइन करू शकता.
पुढे जाण्यासाठी, आपल्याला स्वतःस ऑथेंटिकेट (प्रमाणीकृत)करणे आवश्यक आहे.आपल्याला आपल्या नोंदणीकृत खात्यातून ईमेल प्राप्त होईल.लिंकवर क्लिक करा आणि ईमेलमध्ये दिलेला ‘एक-वेळ पासवर्ड’ एंटर करा.
आपल्याला आपला पासवर्ड बदलण्यासाठी आणि पुन्हा लॉगिन करण्यास सूचित केले जाईल.
स्टेप ७ : एकदा आपण लॉग इन केल्यास, आपली सर्व वैयक्तिक माहिती डीफॉल्टनुसार ऑटोमॅटिक होईल (माहिती ऑटोमॅटिकली येत नसल्यास कृपया अचूक माहिती प्रदान करा). कृपया आपला संपर्क क्रमांक एटंर करा आणि सबमिटवर क्लिक करा.
स्टेप ८ : तो फॉर्म सबमिट केल्यानतंर,आपला सिबिल स्कोअर आपल्या डॅश बोर्डवर दिसेल.याव्यतिरिक्त,आपण आपला क्रेडिट अहवाल डॅश बोर्डवरून मिळवू शकता.
तथापि ,केवळ एकदाच क्रेडिटचा स्कोअर तपासू नका.आपण क्रेडिटचा स्कोअरच्या चढउतारांवर नजर ठेवण्याची गरज आहे कारण बँक,वित्तीय संस्था आणि विविध क्रेडिटचा एजन्सी दर महिन्याला अहवालाचे नूतनीकरण करतात.
सिबिल रेकॉर्ड चांगला ठेवण्यासाठी हे करा

कर्जाचे हप्ते वेळेवर फेडा
कर्जाचे हप्ते वेळेवर न फेडल्यास तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊ शकतो. तुम्ही किती वेळेत हप्ते भरता याचा माग ठेवला जातो. त्यामुळे कर्जाचे हप्ते भरण्यात चालढकल केली तर भविष्यात ही चूक तुम्हाला महागात पडू शकते.
क्रेडिट कार्डासाठी ढीगभर अर्ज करु नका
तुम्ही वेगवेगळ्या बँकांमध्ये क्रेडिट कार्ड आणि कर्जासाठी अर्ज करत असाल तर ती चांगली गोष्ट नाही. त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत काहीतरी त्रुटी आहेत, असा समज होऊ शकतो. तुम्ही कोणतेही कर्ज घेता तेव्हा हा तपशील पाहिला जातो. तुम्ही एखाद्या बँकेच्या क्रेडिट कार्डासाठी अप्लाय केले आणि अगोदरच्या क्रेडिट कार्डाचे हप्ते थकवले असतील तर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होतो.
मिनिमम ड्यूजचा पर्याय शक्यतो टाळाच
तुम्ही क्रेडिट कार्डावर एखादी महागडी गोष्ट खरेदी केली तर त्याचे बिल तात्काळ भरा. तुम्ही पूर्ण हप्ता न भरता मिनिमम ड्यूज भरत राहिलात तर कर्जाच्या विळख्यात अडकू शकता. एका महिन्याचे व्याज दुसऱ्या महिन्यात ट्रान्सफर होत राहिले तर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होतो. त्यामुळे क्रेडिट युटिलायझेन रेट नेहमी 30 टक्क्यांच्या आसपास राहील याची काळजी घ्या.
युटिलाझेशन रेटचे गणित ध्यानात ठेवा
क्रेडिट कार्डाची लिमीट वाढवणे हे युटिलायझेशन रेट वाढवण्याच्यादृष्टीने चांगले ठरते. मात्र, तुम्ही क्रेडिट लिमीट कमी केलीत तर हा रेटही घटतो. समजा एक लाख रुपयांची लिमीट असलेल्या क्रेडिट कार्डावर आऊटस्टँडिंग ड्युज 25000 असेल. मात्र तुम्ही क्रेडिट लिमिट घटवून 60 हजार केली तर युटिलायझेशन रेट 25 टक्क्यांवरून वाढून 42 टक्क्यांवर पोहोचेल.
वेळेआधी कर्ज फेडण्याची घाई करु नका
तुम्ही एखादे कर्ज वेळेआधी फेडले तर तुम्ही निर्धास्त होता. मात्र, याचा विपरित परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो. तुम्ही सिक्योर्ड लोन घेतले असेल तर लोन फोरक्लोझरमुळे क्रेडिट हिस्ट्री कमी होते. तसेच लोन फोरक्लोझरसाठी बँका तुमच्याकडून शुल्क आकारतात.
सिबिल स्कोअर कमी असला तरी कर्ज मिळू शकते?
अनेकांना प्रश्न पडतो की आपला सिबिल स्कोअर हा कमी आहे मग अशा परिस्थितीत आपल्याला कर्ज मिळेल का? खराब किंवा कमी क्रेडिट स्कोअर असल्यासही कर्ज मिळू शकते. पण असे असले तरी क्रेडिट स्कोअर चांगला ठेवणे यातच शहाणपण आहे. कमी क्रेडिट स्कोअर असल्यास तुम्हाला अधिक व्याजाने कर्ज घ्यावे लागते तसेच कर्जाची रक्कमही जास्त मिळू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्याच्या सहाय्याने कमी क्रेडिट स्कोअर असतानाही कर्ज मिळू शकते.
कर्जासाठी अर्ज करताना आपले क्षेत्र वाढवा
वेगवेगळ्या बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये कर्ज मंजूर करण्याची पद्धत, नियम हे वेगवेगळे असतात. काही संस्था कर्ज मंजूर करताना मोठा कट ऑफ ठेवतात तर काही संस्था अशा असतात ज्या कमी क्रेडिट स्कोअर असतानाही कर्ज मंजूर करतात. तज्ञांच्या मते, ज्यांचा क्रेडिट स्कोअर कमी आहे अशा व्यक्तींनी कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करताना अनेक ठिकाणी अर्ज करावा. अशा पतसंस्था, बँका शोधाव्यात जेथे कमी क्रेडिट स्कोअर असला तरी कर्ज मंजूर केले जाते.
आपल्या बँकेसोबत संपर्क साधा
जर तुमचा क्रेडिट स्कोअर हा काही समस्येमुळे खराब झाला असेल तर त्याच्या संदर्भात तुम्ही बँकेसोबत थेट बोलू शकता. तुम्ही बँकेचे जुने ग्राहक असल्याने बँकेला तुम्ही व्यवस्थित सांगू शकतात. त्यामुळे कमी क्रेडिट स्कोअर असूनही आपल्याला चांगल्या अटींवर कर्ज मिळण्यास मदत मिळेल.
सुरक्षित कर्जाचा पर्याय निवडा
कमी क्रेडिट स्कोअरमुळे अनेकांना कर्ज नाकारले जाते किंवा त्यांना खूप जास्त दराने कर्ज मंजूर केले जाते. असे नागरिक सुरक्षित कर्जाचा पर्याय निवडू शकतात. असे कर्ज देताना बँकांसमोर पत जोखीम कमी असते. कारण, कर्जदाराने त्याच्या कर्जाच्या मागणीसमोर गॅरंटी म्हणून एखाद्या गोष्टीची हमी दिली जाते. एखादी व्यक्ती सोने, मालमत्ता, सिक्युरिटीजवर कर्ज घेऊ शकते. पण हा पर्याय आपात्कालीन परिस्थितीतच निवडावा.
संयुक्त कर्ज किंवा गॅरेंटरसह कर्जासाठी अर्ज
कमी क्रेडिट स्कोअर असूनही कर्ज मिळवण्यासाठी संयुक्त कर्ज घेणे हा एक पर्याय आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीसह जोडीदार किंवा कुटुंबातील सदस्य एकत्रितपणे कर्ज लागू केले जाऊ शकते. मात्र, दुसऱ्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर चांगला असणे आवश्यक आहे. कारण दुसरा सदस्य हा सह-अर्जदार म्हणून काम करतो.
चांगले सिबिल स्कोअर रेटिंग
चांगला सिबिल स्कोर कर्जाचा प्रकार
650 वरील घरासाठी कर्ज
700 च्यावर वैयक्तिक कर्ज
650 च्या वर मालमत्ता कर्ज
700 च्या वर व्यवसायासाठी कर्ज
700 च्या वर कारसाठी कर्ज
सोन्यावर कर्ज आवश्यक नाही









































































