Last Updated on 05 Oct 2021 4:30 AM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली :
सासऱ्याची मालमत्ता आणि इमारतीमध्ये जावायला कोणताही कायदेशीर अधिकार असू शकत नाही असा निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. जावयाने जरी इमारतीच्या बांधकामासाठी काही रक्कम खर्च केली असेल तरी देखील त्याचा अधिकार राहणार नाही. न्यायमूर्ती एन. अनिलकुमार यांनी कन्नूरच्या तालिपारंबा येथील डेव्हिस राफेल यांनी खालील न्यायालयाच्या आदेशाविरोधात दाखल केलेले अपील फेटाळत हा निर्णय दिला. सासरे हेंड्री थॉमस यांच्या मालमत्तेवरील डेव्हिस राफेल यांचा दावा कोर्टाने फेटाळून लावला.
न्यायमूर्ती एन. अनिलकुमार यांनी दंड लावत दुसऱ्या अपीलला तहकूब करत सांगितले की, मुलीशी विवाह केल्यानंतर जावई हा त्या परिवाराचा हिस्सा मानला जाते.याचा अर्थ असा होत नाही की सासऱ्याचा संपत्तीवर जावयाचा अधिकार आहे.जरी जावई त्या घरामध्ये राहत असला व त्याने घराच्या बांधण्यासाठी पैसे दिले असतील तरी जावयाचा त्या घरावर किंवा सासऱ्याच्या संपत्तीवर हक्क असणार नाही.













































































