Last Updated on 26 Nov 2025 12:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । साखराळे (ता.वाळवा) येथील माजी सरपंच श्रीमती विजया अधिकराव पाटील (वय ८५ वर्षे) यांचे वार्धक्याने निधन झाले. त्यांनी १९९४ साली तीन वर्षे साखराळेचे सरपंच पद भूषवित गावाच्या विकासात योगदान दिले आहे. त्यांच्या पश्चात विवाहित दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन गुरुवार दि.२७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता साखराळे येथे होणार आहे. माजी उपसरपंच, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील, प्रगतशील शेतकरी शशिकांत पाटील यांच्या त्या मातोश्री होत.










































































