Last Updated on 19 May 2024 6:36 PM by Sanjay Patil/Adhorekhit
चला जाणूया नदीला अभियान…
नदीवर प्रेम करणाऱ्या सेवाभावी संस्था पदाधिकाऱ्यांची कृष्णामाई घाटावरील पारावर बैठक
सांगली । मोठ्या संख्येने लोक नदीकडे यावे नदीची स्थिती पाहून आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करून नदीची परिस्थिती बदलण्यास मदत व्हावी यासाठी सामाजिक काम करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची बैठक कृष्णामाई घाटावरील पारावर घेण्यात आली
सांगली येथे दि.31 मे ते ३ जून रोजी कृष्णामाई ग्रीष्मोत्सव 2024 साजरा करण्यासाठी नियोजन बैठक मध्ये पर्यावरण पूरक जीवनशैलीला उपयुक्त असलेल्या उत्पादन निर्माण करणारे उद्योजक व्यापार करणारे व्यापारी, खाद्य संस्कृतीची विविधता व नवीनता याची झलक देणारे आनंद देणारे स्टॉल्स व त्याचा आनंद घेणारे लोक विविध स्पर्धा त्या स्पर्धांचे प्रायोजक विविध प्रदर्शने त्या प्रदर्शनाचे प्रेक्षक विविध कला त्या कलांचे शिक्षण शैक्षणिक वर्षाची सुरुवात असल्यामुळे शैक्षणिक साहित्याची खरेदी विक्री करण्याची संधी तसेच खेळांचे साहित्य उपकरणे विक्री व खरेदी सेंद्रिय शेती बगीच्या निर्माण करणारी नर्सरी लागणाऱ्या साधनांची विक्री व खरेदी शासकीय उपक्रमांची माहिती देणारे स्टॉल्स सोलर आणि बाईक्स यांचे स्टॉल्स असणार आहेत.

सामाजिक संस्थांचे सांगली जिल्ह्यामध्ये सुरूअसलेले उपक्रम लोकांच्या पर्यंत पोहोचावेत या दृष्टिकोनातून यांना मोफत स्टॉल्स या कार्यक्रमात देण्यात येणार आहेत.
आपत्ती व्यवस्थापन,अग्निशामक यंत्रणा, यांची कार्यशाळा तसेच सामाजिक संस्थां, धार्मिक संस्था शैक्षणिक संस्था महिला बचत गट सरपंच आणि ग्रामसेवक स्वच्छता कामगार इंजिनियर आर्किटेक डेव्हलपर्स इंटिरियर डेकोरेटर कॅटरर्स हॉटेल व्यावसायिक यांच्यासाठी कार्यशाळा.
प्रदर्शने भित्तिपत्रक चित्रकला शिल्पकला फोटो प्रदर्शन जुनी नाणी व तीकर यांचे प्रदर्शन टाकाऊ पासून टिकाऊ चे प्रदर्शन नवका नयन बोटिंग साठी प्राथमिक प्रशिक्षणाची व मार्गदर्शनाची सोय.
कलात्मक कार्यक्रम, गायन, नृत्यकला, पथनाट्य, भारुड, भजन, पोवाडा, किर्तन अभिवाचन स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, खो खो स्पर्धा
तरी वरील सर्व नियोजन येत्या चार दिवसांमध्ये संपन्न करावयाचे असून सामाजिक संस्थांनी या कार्यक्रमासाठी स्वतः उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन डॉ. मनोज पाटील यांनी यावेळी केले. या साठी सांगलीत सामाजिक कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना यामध्ये सामील करून घेणारा असून या बैठकीसाठी डॉ. रवींद्र व्होरा, विजयकुमार दिवाण प्रभाकर केंगार,नरेंद्र देशमुख अशोक ओक, विनायक कुलकर्णी, प्रदीप वायचळ, सुयोग हवळ, श्रुती जोशी, जया जोशी, विशाल गायकवाड, शितल पाटील, मोहन नवले, सर्जेराव पाटील, आदी उपस्थित होते.
आणि कृष्णामाई ग्रीष्मोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडू अशी ग्वाही सर्वांनी या बैठकीत दिली.








































































