Last Updated on 09 Aug 2023 9:33 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली | सहकार विभागातील गट-क वर्गातील सरळसेवेव्दारे भरण्यात येणाऱ्या रिक्त पदांसाठी टी.सी.एस. कंपनीमार्फत सोमवार, 14 ऑगस्ट आणि बुधवार, 16 ऑगस्ट 2023 रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
या परीक्षेच्या प्रवेशपत्राबाबतच्या सूचना उमेदवारांनी अर्ज सादर करतेवेळी नोंदणीकृत केलेल्या भ्रमणध्वनीवर आणि ई-मेल आयडीवर पाठविण्यात आल्या आहेत. प्रवेशपत्र डाऊनलोड करावयाची लिंक आणि याबाबतच्या सूचना सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी संकेतस्थळावरून परीक्षेचे प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे आणि परीक्षेस येताना त्याची रंगीत प्रत सोबत ठेवावी. तसेच प्रवेशपत्रात नमूद सूचनांचे उमेदवारांनी तंतोतंत पालन करावे, असे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.












































































