Last Updated on 02 Oct 2021 11:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई : लवकरच संरक्षण मंत्रालय, मुंबई येथे मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही नोकरभरती वैज्ञानिक सहाय्यक या पदांसाठी असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 23 ऑक्टोबर 2021 या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
एकुण जागा : 13
| पदाचे नाव | जागा | शिक्षण | वय मर्यादा |
| वैज्ञानिक सहाय्यक | 13 | B.Sc Degree | PDF बघा |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
वैज्ञानिक सहाय्यक – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे फिजिक्स, केमेस्ट्री किंवा इतर विषयांमध्ये B.Sc. ची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच जाहिरातीत देण्यात आलेल्या काही क्षेत्रांमध्ये कमीतकमी दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
वैज्ञानिक सहाय्यक – उमेदवारांचे वय हे तीस वर्षांपर्यंत असणे अनिवार्य आहे. त्यावरील वयाच्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार नाही.
कशी होणार निवड
या नोकरभरतीसाठी निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा आणि त्यानंतर मुलाखत अशा पद्धतीने पार पडणार आहे. त्यासाठी दहा मार्कांचे इंग्रजी, Aptitude दहा मार्कचे, दहा मार्कांचे Reasoning, वीस मार्कांचे विज्ञान तर पन्नास मार्कांचे फिल्ड किंवा ट्रेड्शी संबंधित प्रश्न असणार आहेत.
अशा पद्धतीने करा अर्ज
या नोकरभरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी एका चांगल्या प्रतीच्या कागदावर संपूर्ण अर्ज लिहून दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. हा कागद व्यवस्थितपणे एका लिफाफ्यामध्ये ठेऊन त्यावर ज्या पदासाठी अर्ज करू इच्छित आहोत त्या पदाचे नाव लिहायचे आहे. हा लिफाफा संबंधित दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे.
या पत्त्यावर पाठवा अर्ज
फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ, हेडक्वेटीवर, वेस्टर्न नेव्हल कमांड, बॅलार्ड इस्टेट, टायगर गेट जवळ, मुंबई 400001
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 23 ऑक्टोबर 2021 |
| नोकरी ठिकाण | मुंबई |
तुम्हाला या पदांची संपूर्ण माहिती हवी असल्यास जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी त्या मध्ये पूर्ण विश्लेषण दिलेले आहे.
| जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |














































































