Last Updated on 05 Oct 2024 4:37 PM by Sanjay Patil/Adhorekhit
इस्लामपूर, आष्टा व तालुक्यातील ७७८ महिला व पुरुष बांधकाम मजुरांची मोफत आरोग्य तपासणी करून उपचार
ह्रदयरोग,स्त्रीरोग,अस्थिरोग, कान-नाक-घसा,नेत्ररुग्ण,मेडिसिन,सर्जरी, आदी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार
कृष्णा हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरच्या विशेष सहकार्याने चालविले जाते हे आरोग्य केंद्र
सांगली । इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन, इस्लामपूर (कापुसखेड नाका) येथील श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील आरोग्य केंद्रात इस्लामपूर,आष्टा व तालुक्यातील ७७८ महिला व पुरुष बांधकाम मजुरांची मोफत आरोग्य तपासणी करून उपचार करण्यात आले. या आरोग्य केंद्रात बांधकाम मजुरांच्या साठी एक दिवसाचे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर आयोजित केले होते. कराड येथील कृष्णा हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरच्या विशेष सहकार्याने हे आरोग्य केंद्र चालविले जात आहे. युवा नेते प्रतीक पाटील यांनी या आरोग्य शिबिरास भेट देऊन रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.
या शिबिराचा ७७८ रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी ह्रदयरोग,स्त्रीरोग,अस्थिरोग, कान-नाक-घसा,नेत्ररुग्ण,मेडिसिन,सर्जरी, आदी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. यावेळी आवश्यतेनुसार मोफत रक्त,लघवी तपासणी करून ईसीजी व एक्सरे घेण्यात आला. तसेच प्रत्येक रुग्णास मोफत ५० दिवसांच्या टॉनिक च्या गोळ्या,जंताची गोळी देण्यात आली. यातील आवश्यक रुग्णांच्यावर कृष्णा हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये पुढील उपचार केले जाणार आहेत.
कृष्णा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरचे डॉ.व्ही.सी.पाटील,डॉ.दीपेश पाटील, डॉ.निशांत गावकर,डॉ.नदीम सय्यद,डॉ. मनिषा लद्दड,डॉ.तेजल पाटील,डॉ.प्राजक्ता पाटील,डॉ.आरती संगानी,डॉ.शेडगेमॅडम, डॉ.अंकिता,डॉ.नितीन नांगरे,डॉ.शंतनू देशमुख,डॉ.बालकृष्ण निकम,डॉ.आदित्य पित्रे या तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले.
राष्ट्रवादी काँग्रेस असंघटीत बांधकाम संघटनेचे मार्गदर्शक सुभाष सुर्यवंशी, तालुकाध्यक्ष सागर चव्हाण,शहराध्यक्ष निवास जाधव,संपर्क प्रमुख निवास गायकवाड, कार्याध्यक्ष विक्रम धुमाळ,शरद सुर्यवंशी, दत्तात्रय जाधव,तसेच प्राचार्य नकीब मुजावर, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश म्हाळुंगकर यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.










































































