Last Updated on 23 Jan 2025 6:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर | दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने सन 2024-25 करिता हरित उर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई-व्हेइकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्या. यांच्या स्तावरुन सुरु असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थपकांनी केले आहे.
या योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी (अर्ज करण्यासाठी) पोर्टल दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी प्रक्षेपित करण्यात आले असून दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी https://register.mshfdc.co.in ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींनी 6 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असेही महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थपकांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.












































































